कर्जमाफीची घोषणा तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबेना

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सर्वात मोठा प्रश्न आहे. राज्यातील बळीराजा सुखी व्हावा, समृद्ध व्हावा, याकरिता विविध उपाययोजना करण्यात येत असतात. मात्र, तरी सुद्धा चिंताग्रस्त शेतकरी नैसर्गिक किंवा अन्य कारणामुळे आपल्या जीवनाचा शेनट करतोच. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात याकरिता राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. परंतु, राज्यातील विधान परिषद निवडणुकीमुळे याबाबतची अद्यापही घोषणा करण्यात आलेली नाही. सरकारने राज्यातील 55.72 लाख शेतकऱ्यांकडील 36,585 कोटी रुपयांचे थकीत पीककर्ज माफ केल्याचे जाहीर केले. ही कर्जमाफी सरसकट नसून, त्यात दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकीत पीककर्जाची अट सरकारने घातली आहे. या निर्णयामुळे बळीराजाच्या आत्महत्येचे सत्र थांबेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र तरीसुद्धा सात दिवसांत विदर्भातील तब्बल 11 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

कर्जमाफीची घोषणा होऊनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत

Comments are closed.