Photo – पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांसाठी गारेगार शॉवरची सोय

गरमागरम दुपारी गारेगार शॉवरची मज्जा काही औरच! माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही थंडगार पाण्याचा असा शिडकावा हवाहवासा वाटतो. विशेषतः अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्यात तर हा गारवा म्हणजे… व्वा! राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सोमवारी वनराजांची स्वारी आणि गजराजांची जोडी मस्तपैकी डुबण्याचा आनंद लुटत होती. हा स्नानसोहळा टिपण्यासाठी असंख्य नजरांबरोबरच मोबाईलचा कॅमेराही सरसावला होता.

(फोटो चंद्रकांत पालकर)

Comments are closed.