पर्यायी रस्ता असताना शक्तिपीठचा अट्टाहास का? जनआंदोलनातून जयंत पाटलांचा सरकारला सवाल

जयंत पाटील: न मागितलेल्या रस्त्याच्या विरोधात आज आपण आंदोलनं (Shaktipeeth Express Way Kolhapur) करतोय. आजपर्यंत गावचा रस्ता करा, पणांद रस्ता करा, म्हणून सरकारकडे हेलपाटे मारावे लागत होते. फक्त आज चित्र वेगळं आहे. या महामार्गाचे नाव शक्तीपीठ (Shaktipeeth Express Way)  आहे. शक्तिपीठ महामार्ग पंढरपूरपासून दूर नेला आहे. हा शक्तिपीठ महामार्ग नेमकं कशासाठी आहे? महाराष्ट्रातील बंदरांकडे रस्ता जाईना, पण गोव्याकडे महामार्ग जातोय. नागपूर (Nagpur) जिल्ह्यात शक्तीपीठ आहेत का? या प्रश्नावर सरकारकडे उत्तर नाही. सातारा, पुणेकोल्हापूर हा रस्ता अनेक वर्ष होत नाही. या सरकारकडून हातात घेतलेल्या प्रकल्पाची पूर्तता होत नाही. जणू काही महाराष्ट्रातील सगळे प्रश्न संपले, आता फक्त शक्तिपीठ महामार्ग राहिला आहे, अशा अविर्भावात सरकार वागत असल्याचे सांगत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकारवर तोफ डागली आहे.

या संदर्भात खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत. या मोर्चातून बोध घेऊन सरकारने शक्तिपीठाचा आग्रह सोडावा. असेही जयंत पाटील म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्याची ताकद राज्यातल्या अन्य कोणत्याही जिल्ह्यापेक्षा वेगळी आहे. असेही ते म्हणाले. शक्तिपीठ महामार्गविरोधात कोल्हापुरातील (Kolhapur) जनआंदोलनात ते बोलत होते.

जयंत पाटील वर पीएम मोदी : देशाचे पंतप्रधान कोणाकडून तेल खरेदी करायचं हे ठरवू शकत नाही

दरम्यानपर्यायी रस्ता असताना शक्तिपीठचां अट्टाहास धरला जात आहे. या रस्त्यासाठी एक लाख कोटी खर्च करायचा, हे सरकारचे पहिले टार्गेट आहे. आपला निर्णय आता भारत सरकार घेत नाही. व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षाला अमेरिका रात्रीत अटक करून घेऊन जाते. याची भीती आणखी कोणाला आहे का? आता आपल्या देशाचे पंतप्रधान कोणाकडून तेल खरेदी करायचं हे ठरवू शकत नाहीत. रुपयाच अवमूल्य मागच्या काही वर्षात जेवढे झालं तेवढं स्वातंत्र्यानंतरच्या काळात कधीच झालं नव्हतं. आशिया खंडातील सगळ्या करन्सी व्यवस्थित आहेत, आपलीच करन्सी खाली चालली आहे. देशावर कर्ज वाढलं आहे, ते फेडण्यासाठी सर्वसामान्यांना कंगाल करण्याचे काम सुरू आहे. मंत्र्याला वाटलं की त्याच्या गावाकडे हा शक्तीपीठ महामार्ग वळवला जात आहे. पंढरपूरमधून गेला नाही तरी चालेल, पण मंत्र्याच्या गावातून शक्तिपीठ महामार्ग गेला पाहिजे ही भूमिका आहे. कारण तिथे आधीच जमिनी घेऊन ठेवल्या आहेत, असा दोष करत जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

जयंत पाटील: कोल्हापूर जिल्ह्याची ताकद राज्यातल्या अन्य कोणत्याही जिल्ह्यापेक्षा वेगळी

लोकमताच्या विरोधात जाऊन असे रस्ते करणे योग्य नाही. सरकारी यंत्रणांना ही आवाहन आहे, या लढाईत कोणी राहीलं नाही तरी राजू शेट्टी शेवटपर्यंत टिकणार आहे. त्यांचा माझ्यावर नाही पण माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. सत्तेत असणाऱ्या आमदारांना माझी विनंती आहे, त्यांनी घाबरून जाऊ नये. तुम्ही ठामपणे तुमच्या विरोधाची भूमिका मांडा. या संदर्भात खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत. या मोर्चातून बोध घेऊन सरकारने शक्तिपीठाचा आग्रह सोडावा. असेही जयंत पाटील म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्याची ताकद राज्यातल्या अन्य कोणत्याही जिल्ह्यापेक्षा वेगळी आहे. असेही ते म्हणाले.

Comments are closed.