Prakash Amebedkar attack on cm devendra fadnavis and pune police


पुणे – पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. त्याचे नावे दत्तात्रय रामदास गाडे असून त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत. या घटनेचे राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी पुण्यातील बलात्कार प्रकरणावरुन महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच वंचित नेते प्रकाश आंबेडकरांनी पोलिसांच्या भूमिकेवरही शंका घेतली आहे. पुण्यात भल्या पहाटे घडलेल्या या घटनेमुळे सुसंस्कारित पुण्याची दुसरी बाजू समोर आली आहे. या घटनेनंतर पुणे पोलीसांमध्ये पीडित महिलेलाच ब्लेम केले जात असल्याची माहिती मिळाली असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे. महिलेला अपमानित करु नका, असे प्रकाश आंबेडकारंनी पोलिसांनी सुनावले आहे.

नेमके काय म्हणाले प्रकाश आबंडेकर ? 

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून सरकावर टीका केली. त्यात ते म्हणाले की, पुण्यातील मध्यवर्ती स्वारगेट बस डेपोमध्ये तरुणीवर झालेला अत्याचार ही अत्यंत गंभीर घटना आहे. राज्याचे मुख्यमंत्री बदलले पण, परिस्थिती तशीच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने उपस्थित होत असून, देशात महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

पुण्यातील स्वारगेट सारख्या सार्वजनिक ठिकाणी असलेल्या बस डेपोवर महिला सुरक्षित नाहीयेत तर महिला सुरक्षित आहेत कुठे? असा संतप्त सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला

प्रकाश आंबेडकरांनी एक गंभीर आरोप पुणे पोलिसांवर केला आहे. ते म्हणाले, या अत्याचार प्रकरणात पोलीस कारवाईच्या आधीच उलटसुलट चर्चा करत आहेत. महिलेला परत अपमानित करू नका. कधीही पीडितांना ब्लेम केले जात नाही. स्वारगेट प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा : Pune Crime : एसी बसमध्ये कितीही ओरडले तरी बाहेर आवाज जात नाही, बंद गाड्या लॉक करण्याच्या परिवहन मंडळाला सूचना





Source link

Comments are closed.