Ajit Pawar asserted that Prime Minister Modi made him happy by giving Marathi elite status


मुंबई : अनेक वर्षे सरकारे आली आणि गेली, परंतु मराठी माणसाला अभिमान वाटेल, असा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेऊन महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला आनंद दिला, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (26 फेब्रुवारी) केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला धन्यवादही दिले. (Ajit Pawar asserted that Prime Minister Modi made him happy by giving Marathi elite status)

राष्ट्रवादीकडून आज जगविख्यात शिल्पकार डॉ. राम सुतार, पद्मश्री कविवर्य मधु मंगेश कर्णिक, पद्मश्री महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, प्रसिद्ध क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे, प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, उद्योजक इंद्रनील चितळे या दिग्गजांचा अजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण यावर काम सुरू आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने पक्षाची वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्रात अशी व्यक्तीमत्व जन्माला आली, त्यामुळे महाराष्ट्र वेगळ्या उंचीवर जाऊन पोचला आहे. तरुणांनी या व्यक्तींचा आदर्श घेतला पाहिजे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

हेही वाचा – Swargate Rape Case : शिवशाही बस चालकाचा जबाव नोंदवला, आरोपीबाबत धक्कादायक खुलासा

मराठीसाठी अशा दिग्गजांचे कार्य गौरवास्पद

अनेक दिग्गजांनी दिलेल्या अनेक योगदानाबद्दल मराठी अस्मितेचे क्षण आज आपण अनुभवत आहोत. मराठीसाठी अशा दिग्गजांचे कार्य गौरवास्पद आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी गौरवोद्गार काढले. मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळत नाही तोपर्यंत मी लोकसभेत मराठी वगळता इतर भाषेत भाषण करणार नाही असे जाहीर केले होते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे सुनील तटकरे म्हणाले.

कार्यक्रमाला या नेत्यांची उपस्थिती

या कार्यक्रमाला माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार सना मलिक शेख, आमदार पंकज भुजबळ, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा – Swargate Rape Case : राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून घेतली दखल, एफआयआरची प्रत पाठवण्याचे निर्देश


Edited By Rohit Patil



Source link

Comments are closed.