अमेरिकेचे नागरिकत्व हवे, 44 कोटी मोजा!

तब्बल 344 बेकायदा हिंदुस्थानी स्थलांतरितांना हातात बेड्या आणि पाय साखळदंडाने जखडून परत पाठवण्यात आले. आता ट्रम्प यांनी अमेरिकेचे नागरिकत्व हवे असेल तर तब्बल पाच मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 44 कोटी रुपये द्या, अशी योजना आणली आहे. ‘गोल्ड कार्ड’ असे या योजनेचे नाव असून ही योजना ‘ग्रीन कार्ड’ योजनेची जागा घेणार आहे. ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांनी या योजनेची घोषणा केली. पुढच्या दोन आठवड्यांत ईबी-5 म्हणजेच ‘ग्रीन कार्ड’ योजनेची जागा ट्रम्प यांची ‘गोल्ड कार्ड’ योजना घेईल, असे अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड ल्युटनीक म्हणाले.

Comments are closed.