National Commission for Women takes suo motu cognizance of Swargate Rape Case
पुण्यातील गजबजलेल्या स्वारगेट एसटी डेपोमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर मंगळवारी (26 फेब्रुवारी) पहाटे शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडल्याचे आज समोर आले आहे. यानंतर आता राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) स्वारगेट एसटी डेपोतील बलात्कार प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली असून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली.
पुणे : पुण्यातील गजबजलेल्या स्वारगेट एसटी डेपोमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर मंगळवारी (26 फेब्रुवारी) पहाटे शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडल्याचे आज समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे घटनास्थळापासून फक्त 100 मीटर अंतरावर पोलीस ठाणे असतानाच ही गंभीर घटना घडली. या घटनेनंतर पुण्यातील सामाजिक संघटनांसह विरोधक कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत. अशातच आता राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) स्वारगेट एसटी डेपोतील बलात्कार प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली असून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. (National Commission for Women takes suo motu cognizance of Swargate Rape Case)
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया किशोर रहाटकर यांनी मुंबई पोलीस महासंचालकांना पत्र लिहून या प्रकरणात तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये बसची वाट पाहत असताना पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय महिलेवर बलात्कार घटनेचा आयोगाने पत्रातून तीव्र निषेध केला आहे. आरोपी सध्या फरार असल्याचे वृत्त समोर आले आहे, ज्यामुळे सार्वजनिक सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणी उपायांवर गंभीर चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे या घटनेप्रकरणी केलेल्या कारवाईसह एफआयआरची प्रत 3 दिवसांच्या आत पाठवण्यास राज्य महिला आयोगाने महाराष्ट्र पोलिसांना सांगितले आहे.
हेही वाचा – Swargate Rape Case : शिवशाही बस चालकाचा जबाव नोंदवला, आरोपीबाबत धक्कादायक खुलासा
काय आहे प्रकरण?
पीडित तरुणी मंगळवारी सकाळी 5.30 वाजताच्या दरम्यान, स्वारगेट एसटी डेपोमध्ये बसची वाट पाहत होती. पीडितेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून 50 किमी अंतरावर असलेल्या पैठणला जायचे होते. या दरम्यान आरोपी दत्तात्रय गाडे या नराधमाने पीडितेला पैठणला जाणारी बस दुसऱ्या ठिकाणी उभी असल्याचे सांगितले. पीडित तरुणीने त्याच्यावर विश्वास डेपो परिसरातील एका निर्जन ठिकाणी उभ्या असलेल्या रिकाम्या बसपर्यंत गेली. पीडित तरुणी बसमध्ये चढताच आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन दत्तात्रय गाडे हा पळून गेला. पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस सक्रीय झाले आहेत. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आधीच चोरी आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल असलेला दत्तात्रय गाडे त्यांना दिसून आला.
हेही वाचा – Pune Swargate Crime : दारुच्या बाटल्या, कंडोम्स अन् कपडे; स्वारगेट बस डेपोतील ‘शिवशाही’मध्ये लॉजिंग?
Comments are closed.