Legislative Council Deputy Speaker Neelam Gorhe visited ST station and inspected the incident of rape in Shivshahi bus in Pune
पुणे – शिवशाही बसेसची पाहणी केली. बसमधील चालकाच्या मागे असलेलं दार बंद केल्यानंतर बसमध्ये बसलेली एखादी व्यक्ती कितीही ओरडली तरी चालकापर्यंत आवाज पोहोचत नाही असं आमच्या निदर्शनास आलं आहे. आम्ही बस बंद करून पाहिली. बंद बसमधील व्यक्ती कितीही ओरडली तरी बाहेर आवाज येत नाही ही गोष्ट देखील लक्षात आली आहे. ही वस्तुस्थिती पाहून काही उपाययोजना करण्यास प्रशासनाला सूचना केल्या असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या
स्वारगेट बस स्थानकावरुन परगावी निघालेल्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आला. बुधवारी सकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेतील आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. आरोपीच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी आठ पथक तैनात केले आहेत. या घटनेनंतर स्वारगेट बस स्थानकासह पुण्यात महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्वारगेट स्थानकाला भेट दिली. यावेळी त्यांनी आगार प्रमुखांना काही सूचना ही केल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा : Supriya Sule : पुण्यातील घटना कायद्याची दुर्दशा दर्शवणारी, सुप्रिया सुळेंचा संताप
नीलम गोऱ्हे यांच्या पोलीस, प्रशासनाला सूचना
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, या घटनेनंतर अनेक मुद्दे उपस्थित झाले आहेत. त्यानुसार मी रेल्वे पोलीस, परिवहन अधिकारी आणि पुणे शहर पोलिसांना काही सूचना केल्या आहेत. या घटनेशी संबंधित आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज देखील मिळाले आहे. आरोपीने पीडित तरुणीशी ओळख काढली व तिच्या ओळखीचा गैरफायदा घेत बंद बसमध्ये जायला सांगितलं. त्यानंतर तो बसमध्ये चढला आणि त्याने तरुणीवर अतिप्रसंग केला. या प्रकरणी मी स्वतः पोलिसांना आणि प्रशासनाला काही सूचना केल्या आहेत, असं गोऱ्हे म्हणाल्या.
बस आगारात आल्यानंतर बंद झाल्यानंतर त्या लॉक कशा करता येतील, यावर बरीच चर्चा झाल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, रात्री बस पोहोचल्यावर बसेसची साफसफाई झाल्यानंतर त्या सील कराव्या आणि दुसऱ्या दिवशी बस चालक व वाहकाच्या ताब्यात देताना सील उघडून सर्व खातरजमा करूनच त्यांच्या ताब्यात द्यायला हव्यात, अशा सूचना आम्ही केल्या आहेत. यावर बस व्यवस्थापनाने काही तांत्रिक अडचणी उपस्थित केल्या आहेत. दरवाजावर प्रेशर असतं, दार उघडत नाही अशी काही कारणं त्यांनी सांगितली आहेत. त्यावर प्रशासन काम करत आहे.
हेही वाचा : Pune Swargate Crime : दारुच्या बाटल्या, कंडोम्स अन् कपडे; स्वारगेट बस डेपोतील ‘शिवशाही’मध्ये लॉजिंग?
Comments are closed.