मणिपूरमधील राज्यपालांच्या अपीलला प्रतिसाद

शस्त्रास्त्रs अन् दारुगोळा लोकांनी पोलिसांकडे सोपविला : तणाव कमी करण्यास होणार मदत

वृत्तसंस्था/ इंफाळ

मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लागू झाल्यापासून शस्त्रास्त्रs सुरक्षा दलांकडे जमा करण्याचे सत्र सुरू झाले आहे. 87 प्रकारची शस्त्रास्त्रs, दारूगोळा लोक स्वेच्छेने सुरक्षा दलांकडे सोपवित असल्याचे पोलिसांनी बुधवारी सांगितले. इंफाळ पूर्व, विष्णूपूर, कांगपोकपी, जिरीबाम, चुराचांदपूर आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये शस्त्रास्त्रs जमा करण्यात आली आहेत.

तर दुसरीकडे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी मैतेई सशस्त्र समूह अरामबाई तेंगगोलच्या प्रतिनिधिमंडळाची भेट घेतली आहे. राज्यपालांना राज्यात शांतता अन् स्थिती सामान्य करण्यासाठी मदत करण्यास सांगितले आहे. शस्त्रास्त्रs जमा करण्यावरून काही अटींवर चर्चा झाल्याचे या शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले.

मणिपूरमध्ये 13 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारने राष्ट्रपती शासन लागू केले होते. हा निर्णय मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांच्या राजीनाम्याच्या 4 दिवसांनी घेण्यात आला होता. सिंह यांनी 9 फेब्रुवारी रोजी राज्यपालांकडे राजीनामा सोपविला होता. राज्यात 21 महिन्यांपासून जारी हिंसेमुळे 300 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे.

जिल्हानिहाय शस्त्रास्त्रs जमा होण्याचे प्रमाण

इंफाळ पश्चिम : सर्वाधिक शस्त्रास्त्रs इंफाळ पश्चिम जिल्ह्यात लोकांनी पोलिसांकडे जमा केली आहेत.  यात 12 सीएमएजी मॅगजीनसोबत दोन 303 रायफल मॅगजीन, 2 एसएलआर रायफल मॅगजीन, 4 12 बोर सिंगल बॅरल, एक आयईडी आणि दारुगोळा सामील आहे.

जिरीबाम : पाच 12 बोर डबल बॅरल, एक 9 एमएम कार्बाइन मॅगजीनसोबत, दारूगोळा आणि ग्रेनेड पोलिसांकडे लोकांनी जमा केले आहेत. कांगपोकपी : एके47 रायफल 2 मॅगजीनसोबत, एक 303 रायफल, स्मिथ अँड वेसन रिव्हॉल्वर, एक .22 पिस्टल मॅगजीनसोबत, सिंगल बॅरल रायफल, तीन  इम्प्रोवाइज्ड मॉर्टर, 9 मॉर्टर बॉम्ब, ग्रेनेड आणि अन्य सामग्री जमा करण्यात आली.

विष्णूपूर : 6 एसबीबीएल गन, एक रायफल, 3 डीबीबीएल, एक .303 रायफल मॅगजीनसोबत, काबाईन एसएमजी वन मॅगजीनसोबत आणि 15 लाइव राउंड, दारूगोळा आणि अन्य सामग्री पोलिसांकडे जमा करण्यात आली आहे.

थौबल : सब मशीन गन 9 एमएम कार्बाइन 1ए मॅगजीनसोबत, राइयट गन आणि अन्य सामग्री पोलिसांकडे जमा करण्यात आली.

इंफाळ पूर्व : 2 कार्बाइन, एक एसएलआर मॅगजीनसोबत, एक लाइव्ह राउंड, 2 लोकल कार्बाइन मॅगजीन, 4 इन्सास रायफल मॅगजीन, मोठ्या प्रमाणात दारुगोळा पोलिसांकडे स्वाधीन करण्यात आला.

Comments are closed.