पाकिस्तानी घुसखोरांनी पठाणकोटमध्ये शूट केले

बीएसएफकडुन कारवाई : शोधमोहीम सुरू

वृत्तसंस्था/ पठाणकोट

बीएसएफला बुधवारी मोठे यश मिळाले आहे. बीएसएफच्या जवानांनी पठाणकोटच्या आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्रात एका पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान घातले आहे. एक इसम पठाणकोटच्या मार्गाने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान बीएसएफच्या जवानांनी त्याला इशारा दिला, परंतु त्याकडे दुर्लक्ष करत तो पुढे सरकत होता. अशा स्थितीत धोका ओळखून बीएसएफच्या जवानांनी घुसखोराचा खात्मा केला आहे.

ताशपतन बॉर्डर पोस्टवर जवानांना सीमापार संशयास्पद हालचाली आढळून आल्या होत्या. पाकिस्तानी घुसखोर भारतीय सीमेत शिरण्याचा प्रयत्न करत होता. सतर्क जवानांनी केलेल्या कारवाईत घुसखोर मारला गेला. या मृत घुसखोराची ओळख अन् त्याच्या घुसखोरीचा उद्देश जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.  पाकिस्तानी रेंजर्ससमोर या प्रकरणी तीव्र विरोध नोंदविला जाणार असल्याचे बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Comments are closed.