मोठी बातमी: नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार, दिल्लीतून सूत्रं फिरली, रायगडचा पेच कायम
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांवरून मोठी चर्चा सुरू आहे. या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांना स्थगिती दिल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना पालकमंत्री पदासाठी अडून बसल्याचे दिसून आले. हा तिढा सुटणार कधी? असा प्रश्न वारंवार उपस्थित होत असताना नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटलाय.(Gurdian Minister) सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार असून रायगडचा तिढा मात्र अजून कायम असल्याची माहिती भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्याने दिली. नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजनांकडेच ( Girish Mahajan) देण्यात आलं असून आता रायगडचा तिढा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून सोडवावा असं दिल्लीतून सांगण्यात आलंय.
गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री पदावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे. 18 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदाची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली होती. या स्थगितीमुळे शिंदे गटाचे नेते नाराज असल्याचे बोललं जात होतं. दरम्यान बुधवारी (26 फेब्रुवारी) भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी पालकमंत्री पदाचा तिढा दोन दिवसात सुटेल असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वानं तसा स्पष्ट संदेश दिला असून नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन होणार आहेत.
रायगडचा तिढा मात्र कायम
नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर आता नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुटला असून रायगडच्या पालकमंत्री पदाचा पेच मात्र कायम आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार असून ते अन्य कोणाला दिले जाणार नाही असा स्पष्ट संदेश भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दिलाय. गिरीश महाजन पालकमंत्री होणार आहेत. मात्र रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे. यावर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी एकत्र बसून हा पेच सोडवण्याचे संदेश भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. नाशिक आणि रायगडचा पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर रायगड मध्ये भरत गोगावले आणि नाशिक मध्ये दादा भुसे नाराज असल्याचं बोललं जात होतं . आता हा पेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी एकत्र सोडवावा असे आदेश देण्यात आले आहेत.
https://www.youtube.com/watch?v=exypnsd4vto
हेही वाचा:
पालकमंत्रीपदाचा तिढा दोन दिवसांत सुटेल, मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर गिरीश महाजनांचा विश्वास, म्हणाले..
अधिक पाहा..
Comments are closed.