WPL 2025 : मुंबई इंडियन्सची विजयाची हॅट्ट्रिक; आरसीबीला मोठा धक्का
बुधवारी(26 फेब्रुवारी 2025), महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स हे संघ आमनेसामने होते. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सचा सहज पराभव केला. मुंबई इंडियन्सला सलग तिसरा विजय मिळाला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सने पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. आता मुंबई इंडियन्सचे 4 सामन्यांत 6 गुण आहेत. तसेच नेट रन रेट 0.780 आहे. मुंबई इंडियन्सना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला पण त्यानंतर हरमनप्रीत कौरच्या संघाने गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स यांचा पराभव केला.
दिल्ली कॅपिटल्स पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर घसरले आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सचे 6-6 गुण समान आहेत, परंतु मुंबई इंडियन्सचा नेट रन रेट चांगला आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सनंतर, स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या क्रमांकावर आहे. खरंतर, याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्या स्थानावर होते, पण मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर ते तिसऱ्या स्थानावर घसरले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे 4 सामन्यांत 4 गुण आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिले 2 सामने जिंकले, परंतु त्यानंतर त्यांना सलग 2 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
यूपी वॉरियर्स पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. यूपी वॉरियर्सचे 5 सामन्यांत 4 गुण आहेत. या संघांनंतर, गुजरात जायंट्सचा क्रमांक लागतो. खरं तर, आतापर्यंत गुजरात जायंट्सना पहिल्या 4 सामन्यांमध्ये फक्त 1 विजय मिळाला आहे. गुजरात जायंट्स 4 सामन्यांत 2 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. आतापर्यंत गुजरात जायंट्सना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला आहे. तर गुजरात जायंट्सने यूपी वॉरियर्सविरुद्ध विजय मिळवला.
हेही वाचा –
यूपीचा खराब खेळ, 9 षटकांत 80 धावांवरून 142 धावांपर्यंत मजल; 7 खेळाडूंची निराशा
पाकिस्तानमध्ये सुरक्षा धोक्यात..! खेळाडूची पकडली कॉलर, मैदानात घुसला अनोळखी व्यक्ती
मोठा उलटफेर..! अफगाणिस्तानने इंग्लंडला चारली धूळ, चॅम्पियन्स ट्रॉफीतून तिसरी टीम बाहेर
Comments are closed.