सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडावर मास्क, पण पोलिसांचे खबरी कामाला आले, बघताक्षणी नराधम दत्तात्रय गा

<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;"> <एक शीर्षक ="पुणे" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/pune" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे काही पुरावे तपासाच्या दरम्यान समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी शहर परिसरातील ‘पीएमपी’, ‘एसटी’ स्थानकांवर रेंगाळत त्याठिकाणी मुली, तरुणींना आपण पोलिस असल्याचे भासवत फसवण्याचा अनेकदा प्रयत्न त्याने यापूर्वी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याचबरोबर तो एका प्रमुख पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा ‘कार्यकर्ता’ असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे, त्याच्या संपर्कात राजकीय व्यक्ती, पोलिस कर्मचारी देखील असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. दरम्यान हा नराधम आरोपी त्या पिडित मुलीशी बोलण्याआधी त्याने तोंडावरती मास्क लावला असल्याची माहिती आहे.

तोंडावर मास्क लावला पण तरी पटवली ओळख

स्वारगेट बस स्थानकातील काही सीसीटीव्हीमध्ये नराधम आरोपीने तोंडावर मास्क लावलेलं दिसून येतं आहे. मास्कमुळे पोलिसांना त्याची ओळख पटवणे अवघड होते. पोलिसांनी या परिसरातील आणखी काही सीसीटीव्ही तपासले. खबऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर आरोपीची ओळख पटली. त्याचबरोबर नराधम आरोपी ‘पीएमपी’, ‘एसटी’ स्थानकांवर रेंगाळत मुली, तरुणींना आपण पोलिस असल्याचे भासवून जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न त्याने यापूर्वी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

दत्तात्रय रामदास गाडे (वय 37, रा. गुनाट, शिरूर) असे नराधम आरोपीचे नाव आहे. गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात दिसून आले आहे. त्याने बलात्काराच्या घटनेव्यतिरिक्तही काही मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यासाठी तो आपण पोलिस असल्याचे भासवायचा. त्याच्या संपर्कामध्ये आलेल्या राजकीय व्यक्ती आणि पोलिस कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पोलिसांच्या शक्यतेनुसार, आरोपी दत्तात्रय गाडे सातत्याने स्वारगेट बस स्टँडवर जात असावा.  त्यामुळे त्याला परिसरातील पूर्ण माहिती होती. त्याचाच फायदा घेऊन त्याने पीडित तरुणीला एसटी स्टँडवरील निर्जनस्थळी घेऊन जाऊन बलात्कार केल्याचीशक्यता वर्तवली जात आहे. स्वारगेट एसटी स्टँडवर महिला, मुलींची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही पोलिसांकडे येत होत्या. त्या त्या वेळी गस्त घालून, संशयितांची चौकशी करून त्यांना हाकलून देण्यात येत होतं. मात्र, यावेळी ती एकटी असल्याचा आणि अंधाराचा फायदा घेत नराधम आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. 

नेमकं काय-काय घडलं?

पिडीत तरुणीला दत्रात्रय गाडेने जीवे मारण्याची धमकी दिल्याने ही तरुणी घाबरुन गेली. त्यामुळे स्वारगेट बस स्थानकावर आरडाओरड करण्याचे त्राणही तीच्यात उरलं नाही. 26 वर्षांची तरुणी मंगळवारी पहाटे स्वारगेट बस स्थानकात आली. तीला फलटणला जायचे होते. त्यावेळी स्वारगेट परिसरात सराईत गुन्हेगार असलेला दत्तात्रय गाडे सावज हेरण्याचा प्रयत्न करत होता. 26 वर्षांची ही मुलगी एकटी आहे हे पाहून गाडेने तीला आगारात मधोमध उभी असलेली  एस टी फलटणला जाणार आहे असं सांगितलं. सोलापुरहून स्वारगेटला उभी असलेली ही बस पुन्हा सोलापुरला जाणार असून वाटेत ती फलटणला थांबेल असं त्याने पिडीतेला सांगितलं. हे सगळं सांगताना तो पिडीतेला ताई – ताई असे म्हणत होता. त्याच्यावर विश्वास ठेऊन ही तरुणी बसमधे चढली. तीच्या पाठोपाठ दत्तात्रय गाडे देखील बसमधे चढला आणि त्याने तीच्यावर बलात्कार केला. त्यानंतर याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने या तरुणीला दिली. त्यामूळे घाबरुन जाऊन ही तरुणी तीच्यासोबत घडलेला प्रकार कोणाला सांगु शकली नाही. त्यानंतर ती दुसऱ्या बसने फलटणला जायला निघाली. वाटेत असताना तीने हा प्रकार तीच्या घरच्यांना सांगितला. त्यानंतर पोलीसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली.

& nbsp;

Comments are closed.