महाराष्ट्राचं गृहखातं घाशीराम कोतवाल चालवत आहे का? आरोपी सैराट फिरतायत: हर्षवर्धन सपकाळ
हर्षवर्धन सपकल: पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात एका 26 वर्षीय तरुणीचा बलात्कार झाल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरातून या घटनेवरून संताप व्यक्त केला जातोय . महिलांवर वाढते अत्याचार ,महिलांच्या सुरक्षेवरून हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राचा गृह विभाग घाशीराम कोतवाल चालवत आहेत का ?असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फटकारलं आहे .महिलांवर सतत वाढते अत्याचार ,सार्वजनिक .स्थळावर दारूचे अड्डे झालेत .आरोपी सैराट सारखे फिरतायत .देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरले आहेत .अशी कडवी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshawardhan Sapkal) यांनी केलीय .
काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ ?
महाराष्ट्राचा गृह विभाग घाशीराम कोतवाल चालवत आहेत का ?महिलांवर सतत होणारे वाढते अत्याचार ,सार्वजनिक स्थळांवर दारूचे अड्डे झाले आहेत .देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून सपशेल अपयश ठरले आहेत .दुसरीकडे अपमान करा आणि सुरक्षा मिळवा हा उपक्रमही त्यांचा सुरू आहे .महाराष्ट्राच्या एसटीचा ब्रीदवाक्य आहे. मात्र त्याला अनुसरून कुठलेही काम होत नाही .आरोपी सैराट सारखे फिरू लागले आहेत .नाशिकचा पालकमंत्री पद हे येणारा कुंभमेळा यासाठी आपल्या ठेकेदारांना का मिळावं या अनुषंगाने आखला जात आहे .गांधींच्या हत्येत ज्यांचा सहभाग आहे .संभाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडणाऱ्यांना हा पुरस्कार देऊ नये .मोदींना देखील याची कल्पना आहे त्यामुळेच त्यांनी आत्तापर्यंत सत्ता असूनही सावरकर यांना तो पुरस्कार दिलेला नाही अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली .घाशीराम कोतवालाच्या शेवटच्या काळात सर्वाधिक गुन्हे हे मद्यपी, गर्भपात, जबरदस्तीने स्त्रीयांना पळवून नेणे आणि चोऱ्यांचे झाले होते. यावरूनच असा संदर्भ दिला जातो. घाशीराम कोतवालवरती आलेले नाटक देखील वादात सापडले होते.
तरुणीवरील अत्याचारामुळे पुण्यासह राज्यभरात संतप्त पडसाद
दत्तात्रय गाडे याने मंगळवारी पहाटे पुण्यातील स्वारगेट डेपोच्या आवारात उभ्या असणाऱ्या तरुणीला भुलवून एका शिवशाही बसमध्ये नेले होते. ही तरुणी बसमध्ये चढल्यानंतर दत्तात्रय गाडे याने दार बंद करुन घेतले आणि तिच्यावर अत्याचार केले होते. दत्तात्रय गाडे याने एकवेळा नव्हे तर दोनवेळा तरुणीवर बलात्कार केला. ससून रुग्णालयाने पुणे पोलिसांना सुपूर्द केलेल्या तरुणीच्या वैद्यकीय तपासणी अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. पीडित तरुणी ही पुण्यात परिचारिका म्हणून काम करत होती. ती मंगळवारी फलटणमधील आपल्या गावी जाण्यासाठी निघाली होती. या 26 वर्षांच्या तरुणीवर झालेल्या अत्याचारामुळे पुण्यासह राज्यभरात संतप्त पडसाद उमटत आहेत.
हेही वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.