स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे राजकारण्यांच्या बॅनर्सवर; माऊली कटके अन् अशोक
पुणे : पुण्यातून फलटणला जाण्यासाठी ‘ती’ स्वारगेट (Pune Crime News) बसस्थानकात आली. जिथे नेहमी गाडी लागते, त्या फलाटावरील खूर्चीवर ती बसली होती. आरोपी तिच्याजवळ आला. गोड बोलत ओळख करून घेतली आणि नंतर तिकडे बस लागलेली आहे, म्हणत शिवशाही बसमध्ये नेऊन बलात्कार केला. हादरवून टाकणारी ही घटना पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात घडली. या प्रकरणातील नराधम आरोपी दत्ता गाडे (Dattatray Gade) हा एक सराईत गुन्हेगार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर तो एका प्रमुख पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा कार्यकर्ता असल्याचीही माहिती समोर आली आहे. दत्तात्रय गाडे याचा राजकीय व्यक्ती आणि पोलिसांशी संपर्क असायचा अशी माहिती एका वृत्तपत्राने दिली आहे. त्यामुळेच दत्तात्रय गाडे याच्यात स्वारगेट डेपोसारख्या मध्यवर्ती ठिकाणी तरुणीवर बलात्कार करण्याची हिंमत आली असावी, अशी चर्चा आता सुरु आहे. दरम्यान राजकीय फ्लेक्सवर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा (Dattatray Gade) फोटो असल्याचं चित्र आहे, तर दत्ता गाडे याच्या व्हाट्सअप प्रोफाईलला शिरुरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो असल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.
गाडेच्या प्रोफाईल फोटोला आमदार माऊली कटकेंचा फोटो
स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्या व्हाट्सअप प्रोफाईलला फोटो शिरुरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो दिसून येत आहे. माऊली कटके हे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. माऊली कटके यांनी त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांना तिर्थयात्रा घडवल्या. त्यामधे आरोपी गाडे सहभागी झाला होता अशी माहिती आहे. आमदार माऊली कटके यांनी मात्र दत्तात्रय गाडेशी आपला कोणताही संबंध नसून आपण त्याला ओळखत नसल्याचं म्हटलं आहे.
आमदार माऊली कटके यांचं स्पष्टीकरण
आरोपी दत्ता गाडे याच्या व्हाट्सअप प्रोफाईलला फोटो शिरुरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो आहे, त्यावर प्रतिक्रिया देताना माऊली कटके म्हणाले, मतदार संघांतील 10 हजार पेक्षा जास्त लोकांना देवदर्शन करून मी आणलं आहे. अनेक कार्यकर्ते मतदारसंघात फिरत असताना फोटो काढत असतात. माझा संबंधित व्यक्तीसोबत फोटो असला तरी त्याचा माझा संबंध नाही. कारण अनेक कार्यकर्ते मतदारसंघात सोबत फोटो काढत असतात. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चा चुकीच्या आहेत, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
राजकीय फ्लेक्सवर आरोपी दत्ता गाडेचा फोटो
राजकीय फ्लेक्सवर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा फोटो असल्याचं दिसून येत आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीचा राजकीय फ्लेक्सवर फोटो लावण्यात आला आहे. शिरूरमध्ये लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर दत्तात्रय गाडेचा फोटो आहे. शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या फ्लेक्सवर हा आरोपी दत्ता गाडे याचा फोटो लावण्यात आला आहे. अशोक पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावलेल्या फ्लेक्सवर गाडे याचा फोटो आल्यानं आरोपी दत्ता गाडे हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.