दुसऱ्या मुलाशी व्हॉट्सॲवर बोलण्याचा संशय, प्रेयसीवर चाकूनं हल्ला करत जबडा फोडला, प्रियकर अटकेत

सर्वेक्षण गुन्हा: दुसऱ्या मुलाशी व्हाट्सअपवर बोलते या संशयातून विरारमध्ये एका तरुणाने आपल्या प्रेयसीला चाकू हल्ला करत रागाच्या भरात लाथ मारली .यात तरुणीचा जबडा फ्रॅक्चर झाला असून चाकू हल्ल्यामुळे मुलीच्या हातावर आणि मनगटावर चाकूचे वार आहेत . तिच्यावर सध्या विरारच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत . विरार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्यास अटक केली आहे . जखमी तरुणीचे नाव भाविका भालचंद्र गावडे असून ती विरारच्या रामभजन मेडिकल स्टोअर्स मध्ये फार्मासिस्ट म्हणून 4 महिन्यांपासून नोकरी करते . (Virar Crime)

विरार पूर्वेच्या घासकोपरी गावात राहणारा तरुण अक्षय जनार्दन पाटील याचे त्याच गावात राहणाऱ्या 23 वर्षीय भाविका भालचंद्र गावड हिच्याशीप्रेम संबंध होते .अक्षय आणि भाविकांचे या डिसेंबर मध्ये लग्नही ठरले होते .मात्र भाविका दुसऱ्या मुलाशी व्हाट्सअप वर बोलत असते .या रागातून आणि संशयातून अक्षयने तिच्यावर थेट चाकू हल्ला केला .रागाच्या भरात लाथ मारत जबडा तोडल्याची माहिती पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी दिली आहे . (Mumbai Crime)

नक्की प्रकरण काय?

अक्षयने बुधवारी (26 फेब्रुवारी ) दुपारी साडेतीनच्या दरम्यान भाविका नोकरी करत असलेल्या मेडिकल स्टोअर्स मध्ये गेली असता ,अक्षय पाटील या तिच्या प्रियकराने तिच्यावर धारदार हत्यारांना वार केले . आणि तिच्या जबड्याला लाथ मारून जबड्या फ्रॅक्चर केला .दुपारच्या सत्रात भाविकाची सहकारी जेवणासाठी बाहेर गेली होती .त्यामुळे भाविका एकटेच मेडिकल स्टोअर्स मध्ये होती .अक्षयने चाकूने भाविकांवर वार करून तिच्या आईला फोन करून भाविकाला मेडिकलमध्येच मारून टाकल्याचे सांगितलं .भाविकाच्या वडिलांनी मेडिकलमध्ये जाऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या भाविकाला विरारच्या रेडियंट हॉस्पिटलमध्ये नेलं .सध्या भाविकांवर उपचार सुरू आहेत .आरोपी अक्षयला विरार पोलिसांनी अटक केली आहे .

बापच आळीपाळीने तीन मुलींचे लचके तोडत होता, नालासोपाऱ्यातील घटनेने खळबळ

मुंबईपासून काही अंतरावर असणाऱ्या नालासोपाऱ्यात एका इसमाने आपल्या पोटच्या तीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तिन्ही मुलींनी नालासोपारा (Nalasopara Rape case) पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. मुलीचा पिता खंडणी, गोळीबार तसेच हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे. बुधवारी नालासोपारा पोलिसांनी (Police) मुलींचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीचा शोध नालासोपारा पोलीस घेत आहेत. (Nalasopara Crime)

हेही वाचा

https://www.youtube.com/watch?v=wjcz7aawkhs

Nalasopara Crime: बापच आळीपाळीने तीन मुलींचे लचके तोडत होता, वैतागून आई कोकणातून नालासोपाऱ्यात आली, तिथेही तेच घडलं!

अधिक पाहा..

Comments are closed.