तरुणीवर अत्याचार झाल्याची बातमी पोलिसांनी का लपवून ठेवली? योगेश कदमांनी सांगितलं कारण, म्हणाले.
पुणे: स्वारगेट एसटी आगारात तरुणीवर अत्याचार झाल्याची बातमी पोलिसांनी बाहेर येणार नाही, याची जाणीवपूर्वक दक्षता घेतली होती. ही बातमी बाहेर आली असतील तर कदाचित आपल्याला आरोपीचे आता जे संभाव्य लोकेशन मिळाले आहे, ते मिळू शकले नसते. ही बातमी बाहेर आली असती तर आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) हा सावध होऊन लांब पळून गेला असता. त्यामुळे ही घटना लपवण्याचा प्रयत्न झालेला नाही. केवळ गुप्तता बाळगण्यात आली होती, असे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी दिले. ते गुरुवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. (Pune Rape case)
योगेश कदम यांनी गुरुवारी स्वारगेट एसटी आगार आणि पोलीस ठाण्याला भेट दिली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे लवकरच पकडला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. ही घटना एसटी स्टँडच्या आवारात घडली. त्यादिवशी स्वारगेट पोलिसांकडून रात्री 12 ते पहाटे सहा वाजेपर्यंत कितीवेळा गस्त घालण्यात आली, हे सीसीटीव्हीत दिसत आहे. स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक रात्री दीड वाजता एसटी स्टँडच्या आवारात आले होते. त्यानंतर रात्री तीन वाजता पुन्हा एकदा पोलिसांचे पथक इकडे येऊन गेले. त्यामुळे पोलिसांकडून दुर्लक्ष झाले, ते सावध नव्हते, या आरोपात तथ्य नाही, असे योगेश कदम यांनी म्हटले.
आरोपी दत्तात्रय गाडे याच्यावर चोरी व अन्य गुन्हे दाखल आहेत. पुणे शहरातील जे आरोपी आहेत, त्यांचा रेकॉर्ड येथील पोलिसांकडे असतो. त्या आरोपींवर सातत्याने लक्ष ठेवले जाते. ग्रामीण भागातून आलेल्या गुन्हेगारांचा रेकॉर्ड पुणे पोलिसांकडे नसतो. व्यवस्थेत सुधारण करण्यास निश्चितच वाव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीसीटीव्ही लावण्यासाठी 437 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. हे सीसीटीव्ही एआय पद्धतीने कार्यरत असतील. फेशिअल रेकग्निशनच्या माध्यमातून आरोपीचा ओळखीचा चेहरा दिसल्यास पोलिसांना सूचना मिळेल, असे योगेश कदम यांनी म्हटले.
तरुणीने विरोध न केल्याने आजुबाजूच्या लोकांना समजले नाही: योगेश कदम
परवा स्वारगेट एसटी स्टँडवर जी घटना घडली त्यामध्ये कुठलाही स्ट्रगल किंवा फोर्सफुल कृती झाली नाही. ही घटना घडली त्यावेळी शिवशाही बसच्या आजुबाजूला 10 ते 15 लोक होते. पण तरुणीने विरोध न केल्याने कोणालाही शंका आली नाही. त्यामुळे आरोपीला गुन्हा करता आला. आता आरोपी ताब्यात आल्यावर आणखी गोष्टी स्पष्ट होतील, असे योगेश कदम यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=wlva3ln3kji
आणखी वाचा
स्वारगेट बस डेपोत तरुणीवर एकदा नव्हे दोनवेळा अत्याचार, मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती उघड
अधिक पाहा..
Comments are closed.