AFG vs ENG; अफगाणिस्तानचा विजय ऐतिहासिक! सचिन म्हणतो, हा अपसेट नाही….
क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडवर आठ धावांनी शानदार विजय मिळवल्याबद्दल अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे कौतुक केले. सचिन तेंडुलकरने असेही म्हटले की अफगाणिस्तानचा हा विजय आता अपसेट म्हणता येणार नाही. 2023 च्या विश्वचषकातही अफगाणिस्तानने इंग्लंड संघाला पराभूत केले होते.
बुधवारी लाहोरमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने सलामीवीर इब्राहिम झद्रानच्या 146 चेंडूत 177 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर सात बाद 325 धावा केल्या आणि त्यानंतर अझमतुल्लाह उमरझाईच्या (58 धावांत पाच बळी) धारदार गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडला 317 धावांवर रोखले आणि उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या.
सचिन तेंडुलकर या सामन्याबद्दल बोलताना ‘एक्स’ वर लिहिले की, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानची सततची वाढ प्रेरणादायी आहे! त्यांच्या विजयांना तुम्ही आता अपसेट म्हणू शकत नाही, त्यांना आता सवय झाली आहे. इब्राहिम झद्रानचे शानदार शतक आणि अझमतुल्लाह उमरझाईच्या उत्कृष्ट पाच विकेट्समुळे अफगाणिस्तानने आणखी एक संस्मरणीय विजय मिळवला. अफगाणिस्तान संघाने छान खेळ केला!”
2023 च्या विश्वचषकादरम्यान अफगाणिस्तानसोबत मार्गदर्शक म्हणून काम केलेले माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजानेही सोशल मीडियावर संघाचे अभिनंदन केले. ज्यात तो पोस्ट करत म्हणाला, “अफगाणिस्तानचे चाहते या विजयाचे पात्र आहेत कारण ते जगभरातील सर्वात उत्साही आणि नम्र क्रिकेट चाहते आहेत.”
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आशा व्यक्त केली की अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीच्या पलीकडे जाईल. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉननेही अफगाणिस्तानच्या कामगिरीचे कौतुक केले आणि इंग्लंड संघ अपेक्षेनुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरला असे म्हटले. वॉन म्हणाला, “अफगाणिस्तानची शानदार कामगिरी.. विजय पूर्णपणे पात्र होता.. इंग्लंड गेल्या काही वर्षांपासून चांगले व्हाईट बॉल क्रिकेट खेळलेले नाही.. या परिस्थितीत हा निकाल आश्चर्यकारक नाही.”
उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी अफगाणिस्तान संघाला शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवावे लागेल. जर संघाने तो सामना कोणत्याही फरकाने जिंकला तर संघ सहजपणे टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. जर अफगाणिस्तान संघ ऑस्ट्रेलियाला हरवू शकला नाही, तर संघाला पुढे जाणे अशक्य होईल, कारण अफगाणिस्तानच्या खात्यात सध्या फक्त दोन गुण आहेत. पहिल्या सामन्यात त्यांना दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला होता.
हेही वाचा-
शुबमन गिल संघाबाहेर? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताची चिंता वाढली
अफगाणिस्तान-इंग्लंडचा रोमांचक सामना: 642 धावा आणि विक्रमांचा पाऊस!
CT 2025; पाकिस्तान-बांग्लादेश प्रतिष्ठा राखण्यासाठी भिडणार, दोन्ही संघ आधीच बाहेर
Comments are closed.