मुंबई, दिल्लीतून व्हिएतनामचं तिकीट फक्त 11 रुपयात, विमान वाहतूक कंपनीच्या ऑफरनं खळबळ
व्हिएतनाम एअरलाइन्स व्हिएटजेट एअर ऑफरः व्हिएतनामची विमान वाहतूक कंपनी व्हिएतजेट एअरनं अनोखी ऑफर देऊन खळबळ उडवून दिली आहे. या विमान वाहतूक कंपनीनं 11 रुपयांची ऑफर जारी केली आहे. ही ऑफर दर शुक्रवारी उपलब्ध असेल. ही ऑफर 31 डिसेंबर 2025 पर्यंत सुरु राहणार आहे.
नेमकी ऑफर काय?
विमानातून प्रवास करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. भारतात लाखो, कोटी लोकांना विमानातून प्रवास करणं स्वप्नापेक्षा कमी नाही. मात्र, व्हिएतनामच्या एका विमान वाहतूक कंपनीच्या एका ऑफरनं ते पूर्ण होणार आहे. व्हिएतजेट एअर कंपनीनं 11 रुपयांची भन्नाट ऑफर आणली आहे, त्यामुळं हवाई वाहतूक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
व्हिएतनामची विमान वाहतूक कंपनी व्हिएतजेटनं ही ऑफर जारी केली आहे. दर शुक्रवारी ही ऑफर सुरु असेल. या द्वारे भारतातून टॅक्स आणि फी शिवाय फक्त 11 रुपयात तिकीट मिळेल. टॅक्स अन् फीची रक्कम भरावी लागेल. ही तिकीटं इकोनॉमी क्लासमधील उपलब्ध असतील. भारतातील मुंबईदिल्ली, कोच्ची आणि अहमदाबाद येथून व्हिएतनामच्या हो ची मिन्ह सिटी, हनोई आणि दा नांग या सारख्या ठिकाणी जाण्यासाठी 11 रुपयात तिकीट मिळेल.
तिकीट कसं बुक करायचं?
व्हिएतजेट एअर या कंपनीनं दिलेली ऑफर फक्त शुक्रवारी सुरु असेल. ही ऑफर 31 डिसेंबर 2025 पर्यंत सुरु राहील. मर्यादित सीट यासाठी राखीव असतील. यासाठी लवकर बुकिंग करावं लागेल. व्हिएतजेटच्या अधिकृत वेबसाईट www.vietjetair.com किंवा एपवरुन बुकिंग करता येईल.
फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार ही ऑफर 31 डिसेंबर 2025 पर्यंत वैध असेल. मात्र, यामध्ये काही दिवस ब्लॅक आऊट असतील. तुम्ही तुमच्या प्रवासाची तारीख बदलणार असाल तर यासाठी तुम्हाला एक निश्चित फी द्यावी लागेल. तुम्ही तिकीट रद्द केलं तर रिफंड ट्रॅवल वॉलेटमध्ये क्रेडिट केला जाईल. त्यासाठी काही फी आकारली जाईल.
ही ऑफर केवळ स्वस्त नसून भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न आहे. व्हिएतनाममधील प्राकृतिक सौंदर्य, ऐतिहासिक स्थळे, स्वादिष्ट जेवणासाठी प्रसिद्ध आहे. या ऑफरमधून सुंदर देशाचं पर्यंटन करण्याची संधी मिळेल. जर तुम्हाला कुटुंबासह व्हिएतनाम फिरायचं असेल तर ही चांगली संधी आहे.
इतर बातम्या :
अधिक पाहा..
Comments are closed.