अफगाणिस्तानच्या विजयाने बटलर संकटात? कर्णधारपद टिकणार का?

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत इंग्लंड संघाचा अफगाणिस्तान संघाने चांगलाच दारुण पराभव केला. अफगाणिस्तानने इंग्लंड संघाला 8 धावांनी पराभूत केले. या आधी जॉस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलियाला हरवले होते. तसेच आता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत इंग्लंड संघाचा प्रवास संपला आहे. त्याचसोबत इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरचे कर्णधारपद देखील धोक्यात आले आहे. इंग्लंडच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील लाजिरवाण्या खेळीनंतर आता जॉस बटलरचे कर्णधारपद जाण्याच्या मार्गावर आहे. अफगाणिस्तान नंतरच्या सामना झाल्यावर जॉस बटलरने त्याच्या कर्णधारपद तसेच भविष्यावरही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अफगाणिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर जॉस बटलर म्हणाला की, मी आता कोणतीही भावनिक प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. पण सगळ्या गोष्टी समोर स्पष्ट दिसत आहेत. माझ्या कर्णधारपदावर मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. इंग्लंडने 2019 मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. पण त्यानंतर जॉस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने वनडे वर्ल्डकप 2023 , टी 20 वर्ल्डकप 2024 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केली. या 3 आयसीसी स्पर्धेमधल्या खराब प्रदर्शनामुळे बटलरच्या कर्णधारपदावर दिवसेंदिवस प्रश्न उपस्थित होत आहेत.

तसेच याआधी वनडे वर्ल्डकप मध्ये अफगाणिस्तान संघाने इंग्लंडला 69 धावांनी पराभूत केले होते. आता जॉस बटलरचे म्हणणे आहे की, कर्णधार पदावर सगळ्या गोष्टी स्पष्ट आहेत.

त्यानंतर जॉस बटलर म्हणाला की, आमच्यासाठी हा पराभव अत्यंत वेदनादायक आहे. मला वाटत होते की आमच्या संघाचे पारडं जड आहे पण तसे झाले नाही. हा सामना शानदार झाला. पण पराभव होणाऱ्या संघासाठी निराशाजनक ठरला. जॉस पुढे म्हणाला आमचा संघ 48 व्या षटकापर्यंत सामन्यात होता पण जेमी ओवरटन बाद झाल्यानंतर सामना पालटला. तसेच तो म्हणाला अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी शेवटच्या 10 षटकात चांगली फलंदाजी केली. यानंतर आमच्यासाठी गोष्टी कठीण झाल्या.

हेही वाचा

नाद खुळा! 27 वर्षात क्रिकेटमध्ये न घडलेला पराक्रम यावर्षी घडला!

AFG vs ENG; अफगाणिस्तानचा विजय ऐतिहासिक! सचिन म्हणतो, हा अपसेट नाही….

शुबमन गिल संघाबाहेर? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताची चिंता वाढली

Comments are closed.