नांदेडमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयाला उद्घाटकच मिळेना, 4 महिन्यापासून कार्यालय बंद
एनसीपी नांडेड कार्यालय: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नांदेडमधील (Nanded) कार्यालय गेल्या चार महिन्यापासून उद्घाटना अभावी बंद पडले आहे. हिंगोली गेट भागात सुसज्ज स्थितीत असलेल्या या कार्यालयाच्या उदघाटनासाठी पक्षाच्या नेत्यांना वेळ मिळत नसल्याने कार्यकर्त्यांना रस्त्यावरच गाठीभेटी घ्याव्या लागत आहेत. सत्ताधारी पक्ष असूनही राष्ट्रवादीची ही अवस्था पाहून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नांदेडमध्ये (Nanded) उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत उद्या मोठा पक्ष प्रवेश सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे (Mohan Hambarde) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र, हा कार्यक्रम झाल्यानंतर तरी कार्यालयाचे उद्घाटन होणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.
नांदेडमध्ये काँग्रेसला जोरधार धक्का
महाविकास आघाडीतील पक्षांना राज्यातील विविध भागात धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अनेक नेते पदाधिकारी सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये देखील हेच चित्र पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये काँग्रेसला जोरधार धक्का बसला आहे. माजी आमदार मोहन हंबर्डे हे उद्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहे. त्यांच्या प्रवेशानं राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे, तर काँग्रेसची मतदारसंघातील ताकद कमीहोणार असल्याचं बोललं जात आहे.
नांदेड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जीवन घोगरे पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंना पत्र
दरम्यान, नांदेड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जीवन घोगरे पाटील यांनी 18 फेब्रुवारीला देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना पत्र लिहलं होतं. या पत्रामध्ये घोगरे पाटील यांनी नांदेड राष्ट्रवादी भवन शहर पक्ष कार्यालयच्या उद्घाटनासाठी आपला वेळ मिळावा अशा आशयाचे पत्र तटकरेंना लिहलं होतं. उद्या अजित पवारांचा नांदेड दौरा आहे, या दौऱ्यावर पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करावे अशी मागणी घोगरे पाटील यांनी केली आहे. त्यामुळं आता अजित पवार उद्या नांदेडच्या कार्यालयाचं उद्घाटन करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
Amol Mitkari: अजित दादांच्या राष्ट्रवादीत मोठ्या नेत्यांचं इन्कमिंग, अमोल मिटकरींचे सूतोवाच, म्हणाले ‘अनेकजण भेटून गेले दादांना..’
अधिक पाहा..
Comments are closed.