करायला गेली एक, झालं भलतंच… नवऱ्याचा काटा काढायला गेली अन् प्रियकरालाही गमावून बसली

विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढताना प्रियकराचाही मृत्यू झाल्याची घटना सोलापूरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. गणेश अनिल सपट आणि शंकर उत्तम पतडे अशी मयतांची नावे आहेत.
गणेश सपट याचे शंकरच्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध होते. या संबंधात पती शंकर अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकरासोबत मिळून त्याचा काटा काढण्याचं ठरवलं. त्यानुसार गणेश शंकरला पार्टीच्या बहाण्याने घेऊन गेला. गणेश पार्टीसाठी महागावमधील तलावाजवळ शंकरला घेऊन गेला. तेथे त्याने शंकरला भरपूर दारु पाजली. त्याच्यासोबत स्वतःही दारू प्यायला.
गणेश आणि शंकरने तलावाजवळी पुलावर डान्सही केला. यादरम्यान गणेशने पुलावरून शंकरला धक्का दिला. मात्र शंकरला धक्का देताना त्याचाही तोल गेला आणि दोघेही पाण्यात पडले. तलाव खोल असल्याने आणि दोघेही नशेत असल्याने पाण्यात बुडून मरण पावले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी मृत्यूबाबत शंकरच्या पत्नीची कसून चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला.
Comments are closed.