शिवशाही बसमधून उतरल्यानंतर नराधम दत्तात्रय गाडे कुठे गेला? पोलिसांना लोकेशन सापडलं
पुणे: पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात एका 26 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार करुन पळ काढणारा नराधम दत्तात्रय गाडे याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. दत्तात्रय गाडेला (Dattatray Gade) हुडकून काढण्यासाठी शिरुर (Shirur News) आणि आजुबाजूच्या परिसरात पोलिसांची 13 पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिसांकडून पुणे जिल्ह्यातील (Pune Police) परिसर पिंजून काढला जात आहे. रेल्वे स्टेशन, बस स्टँड या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मर्तना पाटील यांनी दिली आहे. अशातच आता पुणे पोलिसांच्या हाती आरोपी दत्तात्रय गाडे याच्याबाबत महत्त्वाची माहिती लागली आहे. पोलिसांना दत्तात्रय गाडे याचे शेवटचे लोकेशन समजले आहे. (Pune Rape news)
स्वारगेट डेपोत शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार केल्यानंतर दत्तात्रय गाडे तातडीने तिथून पसार झाला होता. त्यानंतर दत्तात्रय गाडे याने तातडीने पुणे शहर सोडले होते. तो पुण्यातून थेट शिरुर जिल्ह्यातील आपल्या गावी गुनाट येथे गेल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी दत्ता गाडेचे शेवटचं लोकेशन गुनाट गावात आढळून आले. गुन्हा घडल्याच्या दिवशी आरोपी हा स्वारगेटवरून थेट गावी गेला होता. पण तिथून तो नेमका कुठे गायब झाला, याचा शोध आता पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांच्या अंदाजानुसार दत्तात्रय गाडे हा गुनाट गावाच्या आजुबाजूला शेतांमध्ये लपलेला असावा. त्यामुळे पोलिसांच्या पथकांकडून या भागात शोध मोहीम राबवली जात आहे. दत्तात्रय गाडे याला शोधण्यासाठी पोलिसांकडून डॉग स्क्वॉडची मदत घेतली जात आहे. गुन्हे शाखेने या सगळ्या तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. पोलिसांनी आतापर्यंत दत्तात्रय गाडे याचा भाऊ आणि मित्र-मैत्रिणींची चौकशी केली आहे. या सगळ्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहे. दत्तात्रय गाडेच्या एका मैत्रिणीने पोलिसांनी त्याच्याबद्दल आणखी काही धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळे आता दत्तात्रय गाडे आणखी किती तास पोलिसांना गुंगारा देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पोलिसांनी तरुणीवरील अत्याचाराची माहिती लगेच उघड का केली नाही? गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी सांगितलं कारण
तरुणीवर अत्याचार झाल्याची बातमी पोलिसांनी बाहेर येणार नाही, याची जाणीवपूर्वक दक्षता घेतली होती. ही बातमी बाहेर आली असतील तर कदाचित आपल्याला आरोपीचे आता जे संभाव्य लोकेशन मिळाले आहे, ते मिळू शकले नसते. ही बातमी बाहेर आली असती तर आरोपी दत्तात्रय गाडे हा सावध होऊन आणखी लांब पळून गेला असता. त्यामुळे ही घटना लपवण्याचा प्रयत्न झालेला नाही. पोलिसांकडून केवळ गुप्तता बाळगण्यात आली होती, असे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.
https://www.youtube.com/watch?v=mgwoycyjypc
आणखी वाचा
स्वारगेट बस डेपोत तरुणीवर एकदा नव्हे दोनवेळा अत्याचार, मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती उघड
अधिक पाहा..
Comments are closed.