Pune swargate bus rape case accused dattatray gade last location gunat shirus taluka
पुणे : पुण्यात दत्ता गाडे नावाच्या नराधमाने 26 वर्षीय तरूणीवर स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये दुष्कृत्य केले. तरूणीवर अत्याचार केल्यानंतर दत्ता गाडे फरार झाला आहे. 25 फेब्रुवारीला ( मंगळवारी ) हा प्रकार घडला आहे. गाडेच्या मागावर पोलिसांची 13 पथके आहेत. पण, अत्याचार केल्यावर तो कुठे गेला होता? त्याचे शेवटचे लोकेशन समोर आले आहे.
किर्तनाला हजेरी
आरोपी दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट गावाचा रहिवाशी आहे. तरूणीवर अत्याचार केल्यानतंर गाडेने तातडीने पुणे शहर सोडले. तो थेट गुणाट गावी गेला. गाडेने 25 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजल्यापासून मोबाईल बंद केला. मंगळवारी गाडे गावातील किर्तनाच्या कार्यक्रमात देखील सहभागी झाला होता. बुधवारी ( 26 फेब्रुवारी ) सकाळपर्यंत तो गावातच होता. पण, दुपारी माध्यमातून त्याचे फोटो आणि नावासह बातम्या सुरू झाल्यावर तो गायब झाला.
हेही वाचा : स्वारगेटमधील आरोपीची पोलिसांना ओळख कशी पटली? बसचा दरवाजा उघडा होता? सरनाईकांनी दिली A टू Z माहिती
ऊसाच्या शेतांमध्ये शोध
आरोपी गाडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर 6 गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामिनावर बाहेर असल्याचे सांगितले जाते. शिरूर तालुक्यात ऊसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. त्यामुळे आरोपी गाडे ऊसात लपल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून ऊसाच्या शेतांमध्ये शोध घेतला आहे. यासाठी श्वानपथक आणि ड्रोनचा वापर पोलिसांकडून केला जात आहे. गुणाट गावाला छावणीचे स्वरूप आले आहे.
आरोपीला पकडणाऱ्यास 1 लाख बक्षीस
पुणे पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे याला अटक करण्यासाठी नागरिकांची मदत मागितली आहे. आरोपीबद्दल माहिती देणाऱ्यास 1 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नराधमला फाशीची शिक्षा झाली पाहिजे – एकनाथ शिंदे
“पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. लाडक्या बहिणीवर अत्याचार करण्याची गय केली जाणार नाही. आरोपी हा कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल. नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्याचे सरकारचे धोरण आहे,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
हेही वाचा : बारामतीत 50 कोटी खर्चून बसस्थानक, पण स्वारगेटकडे पुण्याचे ‘पालक’ अजितदादांचे दुर्लक्ष?
Comments are closed.