पाकिस्तानच्या यजमानपदाचा फज्जा, स्पर्धेत ना विजय, ना सन्मान; रिकाम्या हाताने घरी!
तब्बल 29 वर्षांनंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते, मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये त्यांच्या संघाची कामगिरी निराशाजनक ठरली. अवघ्या पाच दिवसांतच पाकिस्तान स्पर्धेबाहेर फेकला गेला. गट ‘अ’ मधील तिन्ही सामने जिंकण्यास अपयशी ठरल्यामुळे यजमान संघ शेवटच्या स्थानावर राहिला.
गट ‘अ’ मध्ये भारत, न्यूझीलंड यांसारख्या बलाढ्य संघांसोबत असलेल्या पाकिस्तानने मोठ्या अपेक्षांसह स्पर्धेला सुरुवात केली होती. परंतु पहिल्याच सामन्यात त्यांना न्यूझीलंडने दारुण पराभव केले. दुसऱ्या सामन्यात भारताविरुद्ध तर संघाने सपेशल फ्लाॅप कामगिरी केली. टीम इंडियाने सहज सामना जिंकला. अखेरच्या गट सामन्यात पाकिस्तानला बांग्लादेश विरुद्ध खेळायचे होते, मात्र पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे पाकिस्तानला या स्पर्धेत पहिला आणि एकमेव गुण मिळाला. मात्र त्यांचा हा एकच गुण पुरेसा ठरला नाही, आणि पाकिस्तान गट ‘अ’ मध्ये शेवटच्या स्थानी राहिला.
– पाकिस्तान.
– 29 वर्षानंतर आयसीसी कार्यक्रमाचे होस्टिंग.
– 0 विजय.
– गट ए मध्ये शेवटचारिझवान आणि त्याच्या बाजूसाठी निराशाजनक स्पर्धा 🏟 pic.twitter.com/ggk6qqerwa
– जॉन्स. (@Criccrazyjhons) 27 फेब्रुवारी, 2025
पाकिस्तानने 1996 नंतर प्रथमच आयसीसी (ICC) स्पर्धेचे यजमानपद भूषवले होते. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा घेत यश मिळवण्याची चाहत्यांची अपेक्षा होती, परंतु संघाने पूर्णतः निराशा केली. खराब फलंदाजी, अपयशी गोलंदाजी आणि नकारात्मक रणनीतीमुळे पाकिस्तानला एकही सामना जिंकता आला नाही.
संघाच्या खराब कामगिरीमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि खेळाडूंवर टीकेची झोड उठली आहे. माजी खेळाडूंनी संघाच्या निवडीवर आणि रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रशिक्षक आणि कर्णधाराच्या भूमिकेवरही मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.
या अपयशानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना वगळण्याची शक्यता आहे, तर प्रशिक्षक मंडळातही मोठे फेरबदल होऊ शकतात. 2027 च्या विश्वचषकासाठी संघ नव्याने उभारण्याचा पीसीबी (PCB) चा प्रयत्न असेल.
यजमान म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकण्याचे स्वप्न पाकिस्तानसाठी दु:स्वप्न ठरले. आता पाकिस्तान क्रिकेटला स्वतःला सावरण्यासाठी मोठ्या प्रमाणात बदल करावे लागतील, अन्यथा भविष्यातील स्पर्धांमध्येही अशीच निराशाजनक कामगिरी कायम राहू शकते.
हेही वाचा-
“दुबईत पाक चाहत्यांची हालत खालावली! कुलदीप यादवच्या उत्तराने शांत”
पाकिस्तानचं नशिबच फुटकं, पावसामुळे बांगलादेशविरुद्ध सामना रद्द, यजमान संघ विजयरहित
भारताचा हा खेळाडू ठरणार न्युझीलंडसाठी घातक , ठोकलेत सर्वाधिक षटकार!!
Comments are closed.