Pune Swargate Rape Case – ना बाचाबाची, ना विरोध, जे काही घडलं ते अगदी शांततेत घडलं! गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वादग्रस्त विधान

पुण्यात स्वारगेट बस डेपोमध्ये तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आला. या भयंकर घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. पुण्यातील बलात्काराच्या या घटनेप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत योगेश कदम यांनी केलेल्या वक्तव्याने ते वादात आले आहेत. घटनेवेळी कुठलाही स्ट्रगल किंवा फोर्सफुल कृती झाली नाही, असे म्हणत योगेश कदम यांनी एक प्रकारे पीडितेवरच शंका निर्माण केली आहे.

परवाच्या दिवशी जी घटना घडली त्या घटनेत फोर्सफुली किंवा कुठला स्ट्रगल किंवा असं काहीही तिथे न झाल्यामुळे बसच्या आजूबाजूला उपस्थित असलेल्या 10 ते 15 लोकांपैकी कुणालाही शंका आली नाही. त्यामुळे कदाचित त्याला गुन्हा सुरळीतपणे करता आला, असं योगेश कदम म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=xqyrz-mmozy

जी काही घटना घडली आहे त्यावेळी तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलीही बाचाबाची किंवा विरोध झालेलं किंवा घडलेलं नाही. जे काही घडलेलं आहे ते अतिशय शांततेत घडलेलं आहे. त्यामुळे तिथे आरडाओरड, हाणामारी चाललेली आहे असं काहीच झालेलं नाही. त्यामुळे आजूबाजूला असलेल्यांनाही काहीच कळलं नाही. त्यामुळे आरोप करण्यापेक्षा ह्या घटनेच्या खोलामध्ये पोहोचून जेव्हा आरोपी आपल्या ताब्यात येईल तेव्हा आपल्याला माहिती मिळेल, असं विधान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले आहे.

Comments are closed.