“क्रिकेट आणि परंपरेचा संगम! भारत-न्यूझीलंड सामन्यात प्रेक्षकांना मोफत इफ्तार बॉक्स”

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा 12 वा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन संघात दुबईमध्ये होणार आहे. या सामन्याबद्दल एक आनंदाची बातमी आहे. भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान प्रेक्षकांना मोफत इफ्तार बॉक्स दिला जाईल. रमजान महिना शनिवारपासून सुरू होत आहे. या महिन्यात दररोज ईफ्तारचा सण साजरा केला जातो. एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने रमजान लक्षात घेऊन एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. दुबईमध्ये होणाऱ्या सर्व सामन्यांमध्ये बोर्ड प्रेक्षकांसाठी इफ्तारचे आयोजन करेल.

खरंतर यूएई क्रिकेट बोर्डाने एक्सवरती एक पोस्ट शेअर केली आहे. दुबईमध्ये होणाऱ्या सामन्यांदरम्यान चाहत्यांना मोफत इफ्तार बॉक्स दिले जातील अशी माहिती देण्यात आली आहे. बोर्डाने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “रमजानचा पवित्र महिना या आठवड्याच्या शेवटी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रविवारी (2 मार्च) रोजी न्यूझीलंड-भारत ग्रुप अ सामन्याने सुरू होईल. यानिमित्ताने स्टेडियममध्ये उपवास करणाऱ्या प्रेक्षकांना इफ्तार बॉक्स दिले जातील.”

भारत आणि न्यूझीलंडचे संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत. हे दोन्ही संघ रविवारी दुबई येथे त्यांचा शेवटचा ग्रुप सामना खेळतील. भारताने त्यांच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशला हरवले. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानला हरवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. पाकिस्तान आणि बांगलादेशचे संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. स्पर्धेचा पहिला सेमीफायनल 4 मार्च रोजी आणि दुसरा 5 मार्च रोजी खेळला जाईल. त्यानंतर अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळला जाईल.

महत्वाच्या बातम्या :

अफगाणिस्तानचा आत्मविश्वास उंचावला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध संपूर्ण रणनीती तयार – हसमतुल्लाह शाहिदी

“दिल्ली कॅपिटल्समध्ये पीटरसनची एंट्री, हिंदीत पोस्ट शेअर करून दिला खास संदेश!”

“हिटमॅन रोहितबद्दल शिखर धवनने सांगितली अनोखी गोष्ट, चाहत्यांची उत्सुकता शिगेला!”

Comments are closed.