पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम

पुणे: शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील स्वारगेट बस (Shivshahi Bus)  स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर चक्क बसमधे बलात्कार (Pune Crime News) केल्याची घटना उजेडात आली आहे. यातील पीडित 26 वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या शिवशाहीबसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. पुण्यातील अत्यंत वर्दळीच्या आणि गजबजलेल्या स्वारगेट एसटी आगारात ही बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने सर्वत्र एकच संतापाची लाट पसरली आहे.

दरम्यान, या घटनेतील नराधम आरोपीची ओळख पटली असून तो सध्या फरार आहे.  दत्तात्रय गाडे असे या आरोपीचे नाव असून फरार गाडेच शोध सध्या पोलिसांकडून घेतला जातोय. (Pune Crime News) दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या आधी गंभीर गुन्हे नोंद आहेत. मात्र वर्दळीच्या आणि गजबजलेल्या स्वारगेट एसटी आगारात आरोपीने या तरूणीवरती एसटी बस स्थानकामध्ये असं कृत्य केल्यानं महिला सुरक्षित आहेत का? असा सवास उपस्थित झाला आहे. अशातच या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी भयावह घटनाक्रम सांगत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर?

पुणे विद्येचे माहेरघर असून अनेक तालुक्यांमधून, जिल्ह्यांमधून, वाड्या- वस्त्यातून, गाव खेड्यातल्या मुली येथे शिक्षणासाठी येत असतात. किंबहुना पुणे हे कायम सुरक्षित राहिले असून शिक्षण घेण्याच्या अनुषंगाने ही हे शहर तरुणींना सुरक्षित वाटत आले आहे. मात्र काल घडलेली स्वारगेटमधील घटना ही अतिशय धक्कादायक आहे. सकाळच्या सुमारास सहा-साडेसहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली असून मुलीवर अत्याचार करून आरोपी हा फरार झाला आहे. नऊ वाजताच्या सुमारास यातील पीडित तरुणीने  पोलिसांना माहिती देत तक्रार नोंदवली. या तक्रारीवरुन पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील तपास सुरू केला. तसेच या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि तरुणीने केलेल्या आरोपीच्या वर्णनांच्या अनुसार आरोपीचा शोध घेतला जात आहे.

यातील आरोपीच्या तपासासाठी आठ पथके नेमण्यात आली आहे. त्यानुसार पुणे आणि आसपासच्या ग्रामीण भागातही तपास सुरू आहे. तसेच आरोपीचा सीडीआर देखील काढण्यात आला असून या आधी देखील त्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असेल अशी माहिती ही रूपाली चाकणकर यांनी दिली.

https://www.youtube.com/watch?v=1otub8egawu

सरकार नेमकं कसली वाट बघतंय? – रवींद्र धंगेकर

दरम्यान यावर बोलताना काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी खळबळजनक आरोप करत स्वारगेट परिसरात अशा गोष्टी सर्रासपणे घडतात. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी वावरत असतात. मटक्याचे अड्डे या परिसरात आहे. किंबहुना हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असून हे प्रकार अजूनही का थांबत नाही? असा सवाल करत सरकार नेमकं कसली वाट बघत असल्याचे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.

त्यावर बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या की, या संदर्भात मी स्वतः पोलीस अधिकाऱ्यांशी बोलले असून या भागात पोलिसांची गस्त त्याही वेळी वाढवण्यात आली होती. महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून मी आवर्जून एक गोष्टीचा या इथे उल्लेख करणार आहे, तो म्हणजे आम्ही राज्यभरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन या संदर्भात जनजागृती करत असतो. तसेच अशा घटनांसाठी एक टोल फ्री क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे. यापुढे जाऊन कुठलाही अनोळखी व्यक्ती सोबत जवळीक साधू नका, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीला प्रतिसाद देऊ नका, असे वेळोवेळी सांगण्यात येतं असतं. अशातच या घटनेतील सीसीटीव्ही तपासले असता असे लक्षात येते की, यातील तरुणीने मास घातलेल्या तरुणाशी चौकशी केली असता कुठे जायचं, कुठलं गाव आहे मी सोडतो असे सांगितलं. त्यामुळे अशा अनोळखी कुठल्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नये, असं मला या ठिकाणी सांगावसं वाटतंय. असेही अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या नेत्या रूपाली चाकणकर म्हणाल्या.

आणखी वाचा

स्वारगेट बस डेपोत 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार, पुणे हादरलं

अधिक पाहा..

Comments are closed.