बिहार निकालाचा धक्का बसला नाही, ‘निवडणूक आयोगाचं’ अभिनंदन; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया


आदित्य ठाकरे भाजपवर संपूर्ण देशाचे  लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल (Bihar Election Result 2025) जाहीर झाला आहे. आतापर्यंतच्या कलानुसार बिहारमध्ये एनडीए आघाडीला भक्कम आघाडी मिळाली आहे. यानुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याच मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. जे काही निकाल आले, त्याचा धक्का बसलेला नाही. मी निवडणूक आयोगाच अभिनंदन करतो, हा त्यांचा विजय आहे. भाजपने आता अमेरिकेतही निवडणूक लढवली असे आदित्य ठाकरे म्हणाले.

वोट चोरी झाली होती, लवकरच आम्ही सगळे मुद्दे बाहेर काढू

जसं तुम्ही पाहिलं तसं आम्ही पाहिलं आहे. जे काही निकाल आले त्याचा धक्का बसलेला नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले. मी निवडणूक आयोगाचं अभिनंदन करतो हा त्यांचा विजय आहे. मतदानाचा अधिकार काढून टाकल्यावर काय होत हे आज दिसल्याचे ठाकरे म्हणाले. नितिश कुमार यांची पंतप्रधान पदासाठी चर्चा सुरु होती, असेही ठाकरे म्हणाले. तेजस्वी यादव यांचा अजेंडा नोकऱ्या देणं हा होता. राहुल गांधी यांनी वोट चोरी दाखवली. वोट चोरी झाली होती. लवकरच आम्ही सगळे मुद्दे बाहेर काढू अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. फोटो मॉडेलचे सर्रास छापले आहेत. काल आणि परवा रात्री स्ट्रॉंग रुम मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. कोणी पुण्यात मतदान केलं आहे त्यांनीच बिहार मध्ये जाऊन मतदान केलं आहे असे ठाकरे म्हणाले.

आम्ही निवडणूक आयोगावर आरोप करतो आणि देवेंद्र फडणवीस उत्तर देतात

आम्ही निवडणूक आयोगावर आरोप करतो आणि देवेंद्र फडणवीस आम्हाला उत्तर देतात, असा टोला देखील आदित्य ठाकरे यांनी लगावला. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केलेल्या टीकेवर विचारले असता, आदित्य ठाकरे म्हणाले की, चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही. सत्य परिस्थिती आहे की वोट चोरी झाली आहे. आम्ही वोट चोरी पकडली त्याचं कामं सुरु आहे. प्रारुप यादी येणार होती. ती अजूनही आलेली नाही. आमचा धसका घेऊन निवडणूक आयोग कामं करत आहे.  जे आता बिहारला गेले आहेत ते मुंबईच्या निवडणूकीची वाट बघतील असे आदित्य ठाकरे म्हणाले. भाजपचे कार्यकर्ते आहेत जे मतदान करत आहेत जाऊन. महिलांचं मत मिळवायला त्यांचा विश्वास संपादन करण गरजेचं आहे. हा टॅक्स पेयरचा पैसा वळवला जात आहे. महिला 1500 वर मतदान करत नाहीत असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

काँग्रेस पक्ष मुस्लिम लीग मावोवादी झालाय, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल, म्हणाले त्यांच्याकडे कोणतही व्हिजन नाही

आणखी वाचा

Comments are closed.