आमदार सुनील शिंदेंचं नाव 7 वेळा, श्रद्धा जाधवांचं नाव 8 वेळा, निवडणूक आयोगाची सर्कस झाली आहे का
आदित्य ठाकरे: 20 नोव्हेंबरला मुंबई महापालिकेची जी प्रारूप मतदार यादी आली, त्यानंतर मोठा गोंधळ समोर आलाय. मुंबईमध्ये 227 वॉर्ड आहेत. 3 ते 4 हजार ऑबजेक्शन आम्ही घेतले आहेत. आमचे आमदार सुनील गोविंद शिंदे यांचे यादीत 7 वेळा नाव आले आहे. त्यांचे वय, फोटो वेगळे आहेत. पण नाव सात वेळा आहे. तर श्रद्धा जाधव यांचे नाव 8 वेळा आले आहे. निवडणूक आयोग तुम्ही सर्कस करत आहात का? असा सवाल उपस्थित करत ठाकरेंच्या सेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी निवडणूक आयोगावर (Election Commission) जोरदार हल्लाबोल केलाय.
आदित्य ठाकरे म्हणाले की, 20 नोव्हेंबरला मुंबई महापालिकेची जी प्रारूप मतदार यादी आली, त्यानंतर मोठा गोंधळ समोर आला. निवडणूक आयोगाची आम्ही भेट घेतली, आम्ही पत्र दिलं. आणखी काही दिवस मागून घेतले. आम्ही स्वतः यादीवर काम करत आहोत. शाखे-शाखेत जाऊन आम्ही करत आहोत. आपण बघतोय बॅग घेऊन येताय. त्यात पैसे आहेत की नाही हे माहिती नाही. कोणी धमक्या देताय. मुंबईमध्ये 227 वॉर्ड आहेत. 3 ते 4 हजार ऑबजेक्शन आम्ही घेतले आहेत.
आमदार सुनील गोविंद शिंदे यांचे यादीत 7 वेळा नाव
निवडणूक आयोगाकडून दाखवलेले 14 लाख दुबार मतदार काढले जातील. आमचे आमदार सुनील गोविंद शिंदे यांचे यादीत 7 वेळा नाव आले आहे. त्यांचे वय, फोटो वेगळे आहेत. पण नाव सात वेळा आहे. तर श्रद्धा जाधव यांचे नाव 8 वेळा आले आहे. ज्योती गायकवाड आणि अनिल देसाई यांचे नाव सुद्धा दुबार मतदारांमध्ये आले आहे. दुबार मतदारांमध्ये मराठी मतदारांची नावं अधिक आहेत. पुढचे दोन दिवस अजून आमच्याकडे आहे. BLO म्हणून कोण येताय ज्यांना लिहिता वाचता येत नाही, असे लोक मतदार तपासणी करत आहेत. यादी वाचता येत नाही, असे लोक येत आहेत. आम्ही BMC, राज्य आणि केंद्र निवडणूक आयोगाला विचारात आहोत तुम्ही काय करत आहात? थट्टा करत आहात, तुम्ही सर्कस करत आहात. हा घोळ तुम्हीच घातलेला आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला.
Aaditya Thackeray: यादीमध्ये 33 हजार नवे मतदार
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, 5 लाख 86 हजार लोकांची दुबार मतदार म्हणून नोंदणी आहे. आता असे काही लोक आहेत जे दुबार आहे. पण त्यांच्या समोर स्टार नाही. मृत मतदारांचे डेथ सर्टिफिकेट देऊन सुद्धा मतदार यादीत त्यांचा नावं आहे. त्यांच्या नावावर कोणी प्रॉक्सि वोटिंग करतंय का? या सगळ्याचे उत्तरं देणार कोण? आम्ही पत्र तर दिले आहे. पण, एक चळवळ आम्ही यासाठी उभी करू. 1 जुलै 2025 नंतर एकही मतदार यादीमध्ये येऊ शकत नाही. पण, आता या यादीमध्ये 33 हजार मतदार हे नव्याने आले आहेत, असा आरोप देखील त्यांनी केलाय.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.