अभिनेत्री हुनर हाली आणि अभिनेता मयंक गांधी यांचा घटस्फोट, 9 वर्षांचा संसार मोडला
टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री हुनर हाली आणि अभिनेता मयंक गांधी यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला आहे. लग्नाच्या 9 वर्षानंतर ते वेगळे झाले आहेत.
हुनर अली व मयांक गांधी यांचे लग्न 28 ऑगस्ट 2016 ला जाले होते. त्यांनी दिल्लीतील गुरुद्वारात शीख पद्धतीने लग्न केले होते. हुनरने सप्टेंबर 2025 मध्ये वैचारिक मतभेदांचे कारण देत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, ज्यावर आता न्यायालयाने अंतिम शिक्कामोर्तब केले आहे.
सेटवरच मिळाली बातमी, हुनर झाली भावूक
घटस्फोटाचा अंतिम निकाल आला तेव्हा हुनर तिच्या ‘रिमझिम – छोटी उमर बडा सफर’ या मालिकेचे शूटिंग करत होती. सेटवरच तिला या निकालाची माहिती मिळाली, ज्यानंतर ती भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ”न्यायालयाची प्रक्रिया पूर्ण झाली तेव्हा हुनर एका सीनचे शूटिंग करत होती. ती कॅमेऱ्यासमोर असल्याने तिला लगेच स्वतःचा फोन तपासता आला नाही. मात्र, दिग्दर्शकाने ‘कट’ म्हणताच तिने धावत जाऊन फोन पाहिला. तिच्या कायदेशीर टीमकडून (Legal Team) कोर्टाचा निर्णय आल्याचे मेसेज आले होते, ज्यामध्ये घटस्फोट मंजूर झाल्याचे लिहिले होते. तो मेसेज वाचताच हुनरला आपल्या भावना रोखता आल्या नाहीत आणि सेटवरच तिच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले”, असे टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीत म्हटले आहे.
Comments are closed.