इब्राहिम झादरानने ठोकले शतक, अफगाणिस्तानने इंग्लंडसमोर उभारला 326 धावांचा डोंगर
यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (ICC Champions Trophy 2025) 8व्या सामन्यात, अफगाणिस्तान आणि इंग्लंड (Afghanistan vs England) संघ आमने-सामने आहेत. दोन्ही संघातील हा सामना लाहोरच्या मैदानावर रंगला आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 325 धावा ठोकल्या आहेत. आता, सेमीफायनलच्या शर्यतीत जिवंत राहण्यासाठी इंग्लंडला 326 धावांचे लक्ष्य गाठावे लागेल.
अफगाण संघाचा सर्वात मोठा हिरो इब्राहिम झादरान (Ibrahim Zadran) ठरला. त्याने 177 धावांची नाबाद शतकी खेळी केली. त्याच्याशिवाय कर्णधार हसमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद नबी आणि अझमतुल्लाह उमरझाई यांनीही लहान खेळी खेळून संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. यादरम्यान इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला हा निर्णय चांगला ठरला नाही कारण अफगाण संघाने 37 धावांवर 3 विकेट्स गमावल्या होत्या.
त्यानंतर, इब्राहिम झादरानने कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीसह 104 धावांची भागीदारी रचली. त्याने आपल्या संघाला पुन्हा सामन्यात परत आणले. शाहिदीने 40 धावा केल्या. त्यानंतर, झद्रानने अझमतुल्लाह उमरझाईसोबत 72 धावांची जलद भागीदारी केली आणि शेवटी मोहम्मद नबीसोबत 111 धावांची जलद भागीदारी केली.
या सामन्यात इब्राहिम झादरानने 177 धावांची खेळी खेळून अनेक रेकाॅर्ड रचले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात अफगाणिस्तानसाठी शतक करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. यासह, तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा खेळाडूही बनला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघासोबतच या संघाला मिळाले उपांत्य फेरीत स्थान, हे 2 संघ झाले स्पर्धेतून बाहेर
आयपीएल 2025 पूर्वी करूण नायरचा मोठा धमाका! देशांतर्गत क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी
भारतीय संघाचा चॅम्पियन्स ट्रॉफी मधील इतिहास काय सांगतो? कसा आहे आत्तापर्यंतचा रेकॉर्ड!
Comments are closed.