प्रवक्ते पदावरून हटवल्यानंतर रुपाली ठोंबरे अजित पवारांच्या भेटीसाठी गेल्या, पण न भेटताच परत आल्
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या प्रवक्ते पदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांना दुसऱ्या पक्षांची ऑफर मिळाल्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तीन पक्षांकडून रुपाली ठोंबरे पाटलांना (Rupali Thombre Patil) पक्षप्रवेशाची ऑफर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रवक्तेपद रद्द झाल्यानंतर रूपाली पाटील (Rupali Thombre Patil) या पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मात्र अजित पवार यांनी त्यांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे रूपाली पाटील या आज अजित पवार यांची भेट घेण्यासाठी दाखल झाल्या. पक्ष कार्यालयात अजित पवार आले नसल्याने रुपाली पाटील बाहेर पडल्या आहेत. काही वेळात अजित पवार पक्ष कार्यालयात येतील. (Rupali Thombre Patil)
Ajit Pawar: पक्ष कार्यालयात अजित पवार आले नसल्याने…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवक्ता पदावरून हटवल्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील अजित पवार यांच्या भेटीला दाखल झाल्या. काही वेळात अजित पवार पक्ष कार्यालयात येणार आहेत. रुपाली ठोंबरे पाटील अजित पवार यांची भेट घेणार आहेत. दोन दिवसांपूर्वी रूपाली पाटील यांची पक्ष प्रवक्ते पदावरून हक्कलपट्टी केली होती. पक्ष कार्यालयात अजित पवार आले नसल्याने रुपाली पाटील बाहेर पडल्या आहेत. काही वेळात अजित पवार पक्ष कार्यालयात येतील. आज अजित पवार पक्ष कार्यालयात पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदेसंदर्भात इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. या दरम्यान जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar: अजित पवार आज पुणे दौऱ्यावर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज अजित पवार यांची रूपाली ठोंबरे पाटील भेट घेऊन त्यानंतर त्या आपला पुढील निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली पाटील हा राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद पुण्यात चव्हाट्यावर आल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. रूपाली ठोंबरेंनी चाकणकरांच्या विरोधात आंदोलन केले होते, त्याचबरोबर फलटण डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणी हल्लाबोल केला होता. बीडमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात पिडीतेला न्याय न देता, तिच्याच चारित्र्याचं हनन केलं असल्याचं ठोंबरेंनी म्हटलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रवक्ते : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नव्याने प्रवक्ते नियुक्त, कोणाला संधी?
अनिल पाटील
रुपाली चाकणकर
ब्रिजमोहन श्रीवास्तव
चेतन तुपे
आनंद परांजपे
अविनाश आदिक
सना मलिक
राजलक्ष्मी भोसले
सुरज चव्हाण
हेमलता पाटील
प्रतिभा शिंदे
विकास पासलकर
राजीव साबळे
प्रशांत पवार
श्याम सनेर
सायली दळवी
शशिकांत लहरी
आणखी वाचा
Comments are closed.