शेतीसाठी कर्ज घ्यायचंय?  RBI ने लागू केला नवीन नियम, किती मिळणार कर्ज?

कृषी बातम्या: देशात असे अनेक शेतकरी आहेत की ज्यांना शेती करायची आहे पण भांडवलाची कमतरता आहे.  त्यांच्याकडे शेतीत गुंतवणूक करण्यासाठी पैसे नाहीत. अशा परिस्थितीत अनेक शेतकरी कर्ज घेऊन शेती करतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने आता या लहान शेतकऱ्यांसाठी कर्ज घेण्यासाठी एक नवीन नियम लागू केला आहे. आरबीआयच्या या नियमामुळे आता लहान शेतकऱ्यांना कृषी कर्ज घेणे सोपे होणार आहे.

सोने-चांदी गहाण ठेवून शेती कर्ज

आरबीआयच्या नवीन नियमानुसार, आता शेतकरी त्यांचे सोने-चांदी गहाण ठेवून शेती कर्ज घेऊ शकतात. पूर्वी काहीही गहाण न ठेवता कर्ज घेण्याची मर्यादा होती, परंतू, आता नवीन नियमानुसार, शेतकरी आता स्वतःच्या इच्छेनुसार त्यांचे सोने-चांदी गहाण ठेवून कर्ज घेऊ शकतात. आरबीआयच्या या नवीन नियमामुळे लहान शेतकऱ्यांना कर्ज घेणे सोपे होईल. 11 जुलैपासून लागू झालेल्या या नियमानुसार, बँका आता शेतकऱ्यांचे सोने-चांदी गहाण ठेवून त्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकतात. यामध्ये शेतकऱ्याची पूर्ण संमती आवश्यक आहे. या नवीन नियमाचा फायदा असा होईल की जर एखाद्या शेतकऱ्याने त्याचे सोने-चांदी गहाण ठेवले तर त्याला काहीही गहाण न ठेवता कर्ज घेण्याच्या फायद्यांपासून वंचित ठेवले जाणार नाही.

शेतकरी आणि बँका दोघांनाही फायदा

सोने आणि चांदी गहाण ठेवून कर्ज घेण्याची सुविधा असल्याने, शेतकरी आपत्कालीन परिस्थितीत सहजपणे कर्ज घेऊ शकतात. यासोबतच बँकांनाही या नियमाचा फायदा होईल. जर बँका सोने आणि चांदी घेतील तर त्यांचा धोकाही कमी होईल.

देशातील शेतकरी विविध संकटांचा सामना करतायेत

सध्या देशातील शेतकरी विविध संकटांचा सामना करत आहेत. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकट शेतकऱ्यावर येत आहेत. या परिस्थितीला तोंड देत शेतकरी चांगल उत्पादन काढत आहेत. दरम्यान, दिवसेंदिवस शेतीचा उत्पादन खर्च वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. वाढत्या खर्चामुळं शेती परवडेना असं झाल्याचं काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे. अनेक शेतकरी वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळं आत्महत्या देखील करत आहेत. 11 जुलैपासून लागू झालेल्या या नियमानुसार, बँका आता शेतकऱ्यांचे सोने-चांदी गहाण ठेवून त्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकतात. यामध्ये शेतकऱ्याची पूर्ण संमती आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या:

Nanded News : कर्ज काढून लेकीचं लग्न लावलं, पण 12 दिवसात नववधूचा दुर्दैवी शेवट, विष पाजलं अन् 1 लाखासाठी जीव घेतल्याचा आरोप, नांदेड हादरलं

आणखी वाचा

Comments are closed.