एकनाथ शिंदे भविष्यात सोबत आल्याने त्यांना गद्दार म्हणणार का? अंबादास दानवे म्हणाले, की…..
डेव्ह अॅम्बेसेड्स: “आमची एवढी मजबूत संघटना फुटली, ती कुणीतरी फोडली याची मनाला कायम सल राहिली. आता शिवसेना म्हणून एकत्रित ताकद राज्याला दिसली पाहिजे. तशी आशा ठेवायला काय हरकत आहे?” असं मोठं वक्तव्य विधान परिषदेचे मावळते विरोधी पक्षनेते आणि ठाकरेंचे शिलेदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी माझा कट्टा या कार्यक्रमात केलं होतं. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) भविष्यात सोबत आल्याने त्यांना गद्दार म्हणणार का? असा प्रश्न अंबादास दानवे यांना विचारला असता ते म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराजांनी हि नेताजी पालकर यांना शुद्धीकरण करून स्वराज्यात घेतलं होतं, यावर मी एवढंच बोलेल. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
शिवसेनेबाबत आजही वेदना होतात, रक्ताने जोडलेले लोक विरोधात गेल्याने वेदना होतात. एकनाथ शिंदेंनाही काहीतरी नक्की वाटत असावे. असेही ते म्हणाले. आम्ही भाजपला उघडपणे भेटलो. आम्ही दुष्मन नाही, विरोधक आहोत. विचारांची लढाई आहे, आमच्यात काही सुरू आहे असं वाटत नाही. असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटी संदर्भात ते बोलत होते.
कृषिमंत्री कोकाटे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही- अंबादास दानवे
राज्यात दुबार पेरणीचं संकट आहे, बी-बियाणे वाया गेलेत, मात्र कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात रमी खेळत असल्याचे दिसलंय. त्यांनी घरी खेळावे, शेतकरी परेशान आणि हे मंत्री असंवेदनशील दिसताय. मंत्री मोबाईल वर खेळत दिसतात हे दुर्दैव आहे. शिवाय त्यांची ही पहिलीच घटना नाही. कधी ओसाड गावची पाटीलकी म्हणतात. तर कधी काहीही बोलतात. ही फडणवीस यांची मजबुरी दिसतेय कि त्यांनी त्यांना मंत्रीपदावर ठेवलंय. त्यावर कारवाई व्हावी आणि त्यांना घरी बसवावे, अशी आमची मागणी आहे. यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली
बच्चू कडू आंदोलन करताय म्हणून आम्ही करावे,असे काही नाही- अंबादास दानवे
कर्जमाफी बाबत बच्चू कडू सत्ता नाही म्हणून आंदोलन करत आहेत. मात्र ते सत्तेवर असताना त्यांनी काय केले? सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. कडू करताय म्हणून आम्ही करावे, असे काही नाही. शेतकरी व्यस्त आहे. त्यामुळं हा योग्य कालावधी नाही. अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.