प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा : अंबादास दानवे
संजय गायकवाड यांच्यावर अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका केली आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या दगलबाज आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकावरील बंदीसाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार असल्याचं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं. त्याला अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अंबादास दानवे म्हणाले की, मला असं वाटतं संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, आत मध्ये काय आहे त्याला माहीत नाही मला असं वाटतं किमान त्याने प्रस्तावना तरी वाचावी.
एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा : अंबादास दानवे
अंबादास दानवे म्हणाले की, दगलबाज शिवाजी, शिवाजी कोण होता? या पुस्तकावर बंदी घालण्यासाठी अधिवेशनात मागणी करणा असल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलंय. मला असं वाटतं संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, आतमध्ये काय आहे त्याला माहीत नाही. मला असं वाटतं किमान त्याने प्रस्तावना तरी वाचावी, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला. प्रबोधनकार ठाकरे ने लिहिलेलं आहे ते पुस्तक, ज्या प्रबोधनकरांच्या विचारावर शिवसेना चालते तुम्ही अशा प्रकारे बोलता. मला असं वाटतं एकनाथ शिंदे साहेबांनी अशा वाचाळविरांचा बंदोबस्त केला पाहिजे, असंही अंबादास दानवे म्हणाले.
आमदार संजय गायकवाड काय म्हणाले?
छत्रपतींचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल जी काही मी शिवीगाळ केली होती त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली आहे. यापुढेही शिवरायांचा अपमान करणाऱ्याचा विषय असेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात दगलबाज,शिवाजी शिवाजी कोण होता या पुस्तकांवर बंदी आणण्याकरता मी मुख्यमंत्री साहेबांकडे आग्रही असणार आहे, असं संजय गायकवाड म्हणाले.
या प्रकरणात याविषयी माननीय न्यायालयाने जे काही आदेश दिले असतील, पोलिसांना सहकार्य करण्यास मी तयार आहे. पोलीस जसे मला सांगतील तसं मी त्यांना सहकार्य करण्यास तयार आहे, असं संजय गायकवाड म्हणाले.
संजय गायकवाड पुढे म्हणाले की, माझे महाराष्ट्र भर समर्थक आहेत अशा अज्ञात समर्थकांकडून प्रशांत आंबी ला धमक्या दिल्या जात असतील. त्यांच्या भावना भडकत असतील तर त्याला मी काही करू शकत नाही.
दरम्यान, प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकावर बंदीची मागणी शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराकडून झाल्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून काय भूमिका घेतली जाणार ते पाहावं लागेल.
आणखी वाचा
Comments are closed.