VIDEO: षटकारांचा वर्षाव, अनाया बांगरचा मैदानात धुमाकूळ; एका दिवसांत 23 मिलियनपेक्षा जास्त Views


अनाया बांगर फलंदाजीचा व्हिडिओ: भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Banger) यांची कन्या अनाया बांगर (Anaya Bangar) हिने पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री केली आहे. अनाया बांगर हिने लिंग बदलण्याचा निर्णय घेतला होता. लिंग बदलण्यापूर्वी अनायाला आर्यन बांगर म्हणून ओळखले जात होते. दरम्यान, अनाया बांगरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अनाया बांगर क्रिकेटच्या नेट्समध्ये सराव करताना दिसत आहे. यावेळी अनाया जोरदार फटके मारताना दिसत आहे. अनाया बांगरचा हा व्हिडीओला एका दिवसांत 23 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिले.

अनन्या बांगरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फलंदाजीचा सराव करतानाचा एक व्हिडीओ (Anaya Bangar Batting Video) शेअर केला आहे, जो लगेचच व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये तिने पुल, स्वीप आणि रिव्हर्स स्वीप सारखे जबरदस्त शॉट्स देखील खेळले. अनायाच्या जोरदार फलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केले. व्हिडीओ शेअर करताना अनायाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझे परिवर्तन पुरुष किंवा महिला क्रिकेटमधील पर्याय नव्हते. ते जगणे आणि नामशेष होणे हे पर्याय होते. माझ्या परिवर्तनापूर्वी क्रिकेट माझे प्रेम होते…ते अजूनही आहे.

अनाया बांगर कोण आहे? (Who is Anaya Bangar?)

अनाया बांगरचा जन्म 26 डिसेंबर 2000 रोजी मुंबईमध्ये झाला. ती माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांचं अपत्य आहे. तिचं आधीचं नाव आर्यन बांगर होतं. बालपणापासून ती एका वेगळ्या ओळखीचा शोध घेत होती, स्वतःची खरी ओळख म्हणून तिला स्त्री म्हणून जगायचं होतं. अनाया यांचं शिक्षण मुंबईच्या डॉन बॉस्को शाळेत झालं आणि नंतर तिनं रिझवी कॉलेजमधून वाणिज्य शाखेचं शिक्षण घेतलं. क्रिकेटमध्ये गाढ रुची असलेली अनाया बालवयापासूनच क्रिकेट खेळत होती. इस्लाम जिमखाना येथे प्रशिक्षण घेणाऱ्या अनायाने यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, मुशीर खान यांच्यासोबत मैदान गाजवलं होतं. तिच्या क्रिकेट कौशल्यामुळे विराट कोहली यांच्यासारख्या खेळाडूंकडूनही तिला मार्गदर्शन मिळालं.

संबंधित बातमी:

ICC WTC: जय शाहांच्या अध्यक्षतेखाली ICC मोठा निर्णय घेणार; WTC स्पर्धा आता नवीन स्वरुपात खेळवली जाणार

आणखी वाचा

Comments are closed.