अजित पवारांना मोदी-शहादेखील आता वाचवू शकणार नाहीत, अंजली दमानिया यांचा इशारा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवले. पण पुणे कोरेगाव पार्क जमीन घोटाळ्यातून फडणवीसच, नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहादेखील आता वाचवू शकत नाहीत. मी त्यांना एकाही केसमधून बाहेर येऊ देणार नाही याची खात्री बाळगा, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला.
पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यासंदर्भात अंजली दमानिया यांनी आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी पुण्यातील जमीन घोटाळ्याच्या टप्प्यांचा तपशील तसेच अनेक नागरिकांकडून मिळालेल्या कागदपत्रांचा संग्रह बावनकुळे यांना दाखवला. हा घोटाळा किती खोलवर रुजला आहे याचे पुरावे उद्या समोर येतील, असे त्या म्हणाल्या.
व्यवहार रद्दीकरणाची चुकीची नोटीस
सरकारने 42 कोटी रुपये देऊन जमीन व्यवहार रद्द करण्याबाबत काढलेली नोटीस चुकीची असल्याचा दावा दमानिया यांनी केला. ही नोटीस महसूल विभागाच्या अधिकार क्षेत्राबाहेरील असल्याने ती अवैध आहे आणि व्यवहार रद्द झाला म्हणजे प्रकरण संपले असे समजू नये, असे दमानिया म्हणाल्या.

Comments are closed.