चौथ्या कसोटीपूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल; अर्शदीप सिंग मालिकेतून बाहेर, ‘या’ धाकड गोलंदाजाची
इंग्लंड विरुद्ध भारत चौथी कसोटी अद्यतनः भारत आणि इंग्लंड यांच्यात 23 जुलैपासून (बुधवार) मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर चौथा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्याआधी भारतीय संघासाठी एक मोठी चिंतेची बातमी समोर आली आहे.
जखमी वेगवान गोलंदाज अरशदीप सिंह यांचे मुखपृष्ठ म्हणून हरियाणा सीमर आशुल कंबोजने मँचेस्टरमध्ये भारतीय कसोटी संघात सामील होण्याची तयारी दर्शविली. #Indvseng pic.twitter.com/128malzbfr
– प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (@pti_news) 20 जुलै, 2025
अर्शदीप सिंग दुखापतीमुळे बाहेर
भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग दुखापतीमुळे चौथ्या कसोटीतून बाहेर झाला आहे. 17 जुलै रोजी सराव सत्रादरम्यान, अर्शदीपला चेंडू अडवताना डाव्या हाताला जखम झाली. त्याला तात्काळ उपचार देण्यात आले, पट्टी बांधण्यात आली आणि नंतर टाकेही घालण्यात आले. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, अर्शदीपला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किमान 10 दिवस लागतील.
India भारतासाठी एक मोठा सेट-बॅक 🚨
– दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात अर्शदीप सिंग यांना नाकारले जाण्याची शक्यता आहे. [Devendra Pandey From Express Sports] pic.twitter.com/ktbrcfuclt
– जॉन्स. (@Criccrazyjhons) 19 जुलै, 2025
अंशुल कंबोजची टीममध्ये एन्ट्री
अर्शदीपच्या जागी हरियाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. 24 वर्षीय अंशुलने अलीकडेच भारत-A संघाकडून इंग्लंड लॉयन्सविरुद्ध दोन फर्स्ट क्लास सामने खेळले आणि आपल्या वेग व अचूक लाइन-लेंथमुळे निवड समितीचं लक्ष वेधलं. जिथे त्याने दोन तीन दिवसांचे सामने खेळले आणि दोन सामन्यांमध्ये पाच विकेट्सही घेतल्या.
दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावातही कंबोजने 51 धावा केल्या. तसेच, हरियाणासाठी त्याने 24 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 79 विकेट्स घेतल्या आहेत. तो लवकरच इंग्लंडला पोहोचून टीम इंडियामध्ये सामील होईल. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे की, अर्शदीपला खोल दुखापत झाली आहे आणि त्याच्या पायांनाही दुखापत झाली आहे. त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किमान दहा दिवस लागतील. निवडकर्त्यांनी कंबोजला संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
चाचणी पदार्पणासाठी कॉन्केक्शनमध्ये अंशुल कंबोज.
– चौथ्या कसोटीतून आकाशदीपला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. (TOI). pic.twitter.com/y1lhbizzv
– मुफद्दाल वोहरा (@mufaddal_vohra) 20 जुलै, 2025
भारताचा 18 सदस्यीय कसोटी संघ : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), नीतीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), करुण नायर, अभिमन्यू ईश्वरन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, अंशुल कंबोज, कुलदीप यादव.
आणखी वाचा
Comments are closed.