जेवायला जातोय सांगून घरातून निघाला, अटल सेतूवर पोहोचताच समुद्रात उडी मारली, पुण्यातील प्रतिकने

अटल सेतू नवी मुंबई क्राईम न्यूज नवी मुंबई: अटल सेतू पुलावरून (Atal Setu) समुद्रात 28 वर्षीय तरुणाने उडी मारली होती. या तरूणाची शोधमोहिम हाती घेवूनही पोलिसांना त्याची बॅाडी मिळालेली नाही. 28 वर्षीय प्रतिक सुभाष रासकर रविवारी (7 जून) मध्यरात्री अटल सेतूवरून समुद्रात उडी मारून आत्महत्या केली होती. हा मूळचा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रहिवासी आहे. तो शेअर मार्केट क्लासेसशी संबंधित काम करत होता. घटनेपूर्वी तो आपल्या कुटुंबीयांना बाहेर जेवणासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर त्याने आपली कार अटल सेतूवर उभी करून समुद्रात उडी मारल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी दिवसभर समुद्रात शोधमोहिम हाती घेतली होती. मात्र अद्याप बॅाडी हाती लागलेली नाही. प्रतिकने आत्महत्या का केली? याचे ठोस कारण समोर आलेले नाही. (Atal Setu Navi Mumbai Crime News)

नेमकं काय घडलं? (Atal Setu Navi Mumbai Crime News)

प्रतिक सुभाष रासकर शेअर बाजार शिकवणी वर्गाशी संबंधित सर्व कामे करायचा. 7 जून रोजी प्रतिक जेव्हा घराबाहेर पडला. तेव्हा त्याने सांगितले की, मी जेवण करायला बाहेर जात आहे. त्यानंतर प्रतिक कार घेऊन अटल सेतूवर आला. अटल सेतूवरील यंत्रणांची नजर चुकवून प्रतिकने थेट समुद्रात उडी घेतली. 7 जून रोजी मध्यरात्री 1 वाजून 29 मिनिटाला सदर घटना घडली.

पोलिसांकडून शोधमोहीम सुरू, प्रतिकची सगळी माहिती दिली- (Navi Mumbai Crime News)

सदर घटनेची माहिती मिळताच उलवे पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण असून, प्रतिक रासकर याबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास तात्काळ उलवे पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या तरुणाचे वर्णन पोलिसांनी जाहीर केलेले आहे. त्यानुसार त्याचा रंग गोरा, शरीरयष्टी मजबूत, उंची अंदाजे 5 फूट 10 इंच, काळे वाढलेले केस, काळे डोळे तसेच थोडी वाढलेली दाढी-मिशी आहे. घटनेच्या वेळी त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि ग्रे रंगाची पॅन्ट परिधान केली होती. तो मराठी आणि हिंदी भाषा बोलतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Beed Crime: गुंगीचे औषध घालून बळजबरीनं आधी मंचुरियन खाऊ घातले, नंतर लॉजवर दोघांकडून अत्याचार, ब्लॅकमेल करत तीन लाख रुपयांसह साडेनऊ तोळं सोनंही उकळले, अंबाजोगाई हादरलं!

Comments are closed.