पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना या योजनेत पत्नीसोबत एकदा गुंतवणूक करा, एक लाख 11 हजार रुपये मिळतील

पोस्ट ऑफिस योजना : पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देशातील नागरिकांना गुंतवणुकीचे अनेक सुरक्षित पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. पोस्ट ऑफिसने अनेक बचत योजना सुरू केल्या आहेत.
विशेष म्हणजे बँकांच्या एफडी योजनांचे व्याजदर यंदा कमी झाले असले तरी या बचत योजनांचे व्याजदर मात्र कायम आहेत. दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या सर्वात लोकप्रिय योजनेची माहिती पाहणार आहोत.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (एमआयएस) गुंतवणूकदारांमध्ये नेहमीच चर्चेत असते. या योजनेत गुंतवणूक केल्याने दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात ठराविक रक्कम मिळते, त्यामुळे नियमित उत्पन्नाचा एक स्थिर स्रोत तयार होतो.
या योजनेत गुंतवणूक करताना कोणत्याही प्रकारची जोखीम येण्याची भीती नाही, कारण या योजनेची भारत सरकारची हमी आहे. त्यामुळे ही योजना सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी अतिशय सुरक्षित पर्याय मानली जाते. फक्त 1000 रुपयांमध्ये खाते उघडता येते आणि गुंतवणुकीचा कालावधी 5 वर्षांचा असतो.
१८ वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक या योजनेअंतर्गत खाते उघडू शकतो. एखादी व्यक्ती स्वतःचे खाते (सिंगल अकाउंट) उघडू शकते किंवा पत्नीसोबत संयुक्त खाते देखील उघडू शकते. एका खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 15 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात.
पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेवर सध्या ७.४० टक्के वार्षिक व्याज दर लागू आहे. या दरानुसार एखाद्या गुंतवणूकदाराने संयुक्त खात्यात रु. 15 लाख गुंतवल्यास,
त्यामुळे त्याला व्याज म्हणून दरमहा ९,२५० रुपये मिळतील. त्याचप्रमाणे एका खात्यात 9 लाख रुपये गुंतवल्यास दरमहा सुमारे 5,500 रुपये व्याज मिळते.
मुदतपूर्तीच्या शेवटी गुंतवलेली मूळ रक्कम परत केली जाते आणि हवे असल्यास खात्याचे नूतनीकरण करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही सेवानिवृत्तांसाठी, नियमित उत्पन्नाच्या शोधात असलेल्या नागरिकांसाठी किंवा कमी जोखमीच्या गुंतवणूकदारांसाठी चांगली आणि विश्वासार्ह योजना आहे.
Comments are closed.