BAN vs PAK: 18 वर्षात केवळ चौथा विजय! बांगलादेशने पाकिस्तानला 7 गडी राखून चारली धूळ
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश: सध्या पाकिस्तान आणि बांगलादेश संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिल्या टी20 सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला 7 गडी राखून धूळ चारली. ढाका येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करताना केवळ 110 धावांवर ढेपाळला होता. प्रत्युत्तरात बांगलादेशने 28 चेंडू बाकी असताना मोठा विजय मिळवला. टी20 क्रिकेट इतिहासात बांगलादेशने पाकिस्तानला हरवण्याची ही केवळ चौथी वेळ आहे. सलामीवीर परवेज हुसेनने अर्धशतकीय खेळी करत आपल्या संघाच्या विजयात मोठे योगदान दिले. (पाक वि बंदी 1 टी 20)
सामन्यात पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करताना केवळ 110 धावांवर ऑलआउट झाला. फखर जमानच्या 44 धावांच्या खेळीमुळे पाकिस्तान संघ 100 धावांचा टप्पा पार करू शकला, हेच नशीब. एका क्षणी पाकिस्तानसाठी 60-70 धावांपर्यंत पोहोचणेही कठीण वाटत होते. 46 धावांपर्यंत अर्धा संघ तंबूत परतला होता. त्याच वेळी खुशदिल शाहने 17 आणि अब्बास आफ्रिदीने 22 धावा केल्या. (Bangladesh Pakistan T20)
या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही, कारण संघाच्या 2 विकेट्स अवघ्या 7 धावांवर पडल्या होत्या. यानंतर सलामीवीर परवेज हुसेन आणि तौहीद हृदय यांच्यातील 73 धावांच्या भागीदारीने बांगलादेशचा विजय मोठ्या प्रमाणात निश्चित केला. हृदयने 36 धावा केल्या, त्यानंतर जाकिर अली आणि परवेज हुसेन यांनी मिळून बांगलादेशचा विजय निश्चित केला. हुसेन 56 धावांवर नाबाद परतला, तर अलीने 15 धावांचे योगदान दिले. (Bangladesh win Pakistan)
18 वर्षांत बांगलादेशने टी20 सामन्यात पाकिस्तानला हरवण्याची ही केवळ चौथी वेळ आहे. टी20 मध्ये बांगलादेशने पाकिस्तानला पहिल्यांदा 2015 मध्ये हरवले होते, त्यानंतर लगेचच पुढच्या वर्षी त्यांना पाकिस्तान संघावर पुन्हा मोठा विजय मिळाला. 2023 मध्येही बांगलादेशने पाकिस्तान संघाला 6 गडी राखून पराभूत केले होते. (Bangladesh cricket history)
Comments are closed.