‘शक्य असेल तर माझ्या मृत्यूनंतर…’, बारामतीत बँक मॅनेजरनं कामाच्या ठिकाणीच गळ्याला दोर लावली;
बारामती: बारामतीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरती असलेल्या बँक ऑफ बडोदा येथील बँकेच्या मॅनेजरने बँकेतच गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवशंकर मित्रा (वय 45, मूळ.रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. बारामती) यांनी गुरुवारी (ता. 17) मध्यरात्री बँकेतच गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Baramati Crime News)
आत्महत्येपूर्वी शिवशंकर मित्रा यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे की, मी बँकेच्या कामाच्या अतिरिक्त दबावाला कंटाळून आत्महत्या करत आहे, माझी बँकेला विनंती आहे की, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण देऊ नका, सर्वच कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव आहे. ते आपले शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करत असतात. मी आत्महत्या पूर्णतः शुद्धीत असताना आपल्या इच्छेनुसार करत आहे. यात माझ्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही. बँकेच्या कामाच्या जास्त प्रेशरमुळे मी आत्महत्या करत आहे. माझी पत्नी प्रिया व मुलगी माही दोघींनीही मला माफ करावे. शक्य असेल तर माझ्या मृत्यूनंतर माझ्या दोन्ही डोळ्यांचे दान करावे, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Baramati Crime News)
कामाच्या ठिकाणी असलेल्या ताणामुळे एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या मॅनेजरने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करावी या घटनेने बारामतीत खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मित्रा यांनी स्वेच्छानिवृत्तीची मागणी केली होती. बँकेच्या कामाचा ताण त्यांना असह्य झाला होता. शेवटी या त्रासाला कंटाळून त्यांनी थेट आत्महत्येचा निर्णय घेतला. या घटनेनं संताप देखील व्यक्त होत आहे.(Baramati Crime News)
मरण्यापूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत लिहली शेवटची इच्छा
शक्य असेल तर माझ्या मृत्यूनंतर माझ्या दोन्ही डोळ्यांचे दान करावे, असंही शिवशंकर मित्रा यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं?
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवशंकर मित्रा हे मूळ उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी आहेत, ते गेली अनेक वर्ष बँक ऑफ बडोदाच्या शाखा व्यवस्थापक म्हणून काम करत होते. मात्र कामाच्या ठिकाणी मोठा ताण असल्याने गेल्या काही दिवसांपासून शिवशंकर मित्र तणावाखाली होते. त्यांनी या संदर्भात घरच्यांशी चर्चा केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. पाच-सहा दिवसापूर्वीच त्यांनी बँकेकडे स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केला होता, मात्र त्यांच्या या अर्जाला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना ही नोकरी सोडायची होती, ते अनेक दिवस वरिष्ठांना अतिरिक्त दबाव टाकू नका असे म्हणत होते, मात्र कोणीच ऐकले नाही. त्यामुळे काल रात्री उशिरा त्यांनी सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली. यामध्ये त्यांनी बँकेच्या अतिरिक्त दबावामुळे आपण आत्महत्या करत आहोत असे स्पष्ट केले आहे.(Baramati Crime News)
भिगवण रस्त्यावरील ‘बँक ऑफ बडोदा’ बँकेच्या शाखेत काल (गुरुवारी) शिवशंकर मित्रा यांनी रात्री उशिरा आपलं जीवन संपवलं. बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक शिवशंकर मित्रा यांनी गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला. सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्यावरील अतिरिक्त दबावाचा उल्लेख केला आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्र दान करावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केल्यामुळे सर्वजण भावूक झाले. त्याचबरोबर त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये आपल्यासोबत काम करणाऱ्यांवर दबाव टाकू नका असंही म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.