माजलगाव शहरात गाडीत सहा लाख रुपये पकडले, निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची कारवाई

शहरातील बायपास रोडवर सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास एका जीपमध्ये ठेवण्यात आलेले सहा लाख रुपये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पकडल्याने एकच खळबळ उडाली. हे पैसे कोणाचे याबाबत शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

सोमवारी शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक उमेदवाराकडून प्रचाराचा वेग वाढला होता. संध्याकाळी साडेसात वाजता बायपास रोड असलेल्या तबेल्यासमोर एका जीपमध्ये पैसे वाटप केली जात असल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी गौरव इंगोले यांना मिळाल्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी जाऊन जीपची तपासणी केली असता त्यामध्ये सहा लाख रुपये सापडले. सापडलेले पैसे जप्त केले असून हे वाहन कोणाचे आहे, पैसे कोणाचे होते याची चौकशी जात आहे. सदरील सापडलेल्या पैसे व सदरील वाहनावर अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

रात्री निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बायपासवर असलेल्या तबेल्यासमोर उभ्या असलेल्या जीपमध्ये पैसे पकडून जप्त केले आहेत. सदरील व्यक्तीस या पैशाचा हिशोब देण्यास सांगितला आहे. – सुंदर बोंदर , सहाय्यक निवडणूक निर्णय, अधिकारी तथा मुख्याधिकारी न.प. माजलगाव.

Comments are closed.