आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांकडूनच वसूल करणार बंदोबस्ताचा खर्च; बीड पोलिसांचा मोठा निर्णय
बीड पोलिस: विविध मागण्या मान्य करण्यासाठी आत्मदहन किंवा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न काही जणांकडून केला जातो. मात्र आता बंदोबस्तासाठी नेमलेल्या मनुष्यबळाचा खर्च वसूल करण्याची भूमिका बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत (Navneet Kanwat) यांनी घेतलीय. गुरुवारी आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या एकाला साडेतीन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
मागण्यांसाठी आंदोलक टोकाचे पाऊल उचलून आत्मदहन किंवा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करतात. अशा वेळी अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाला मोठा फौजफाटा तैनात करावा लागतो. आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तासोबतच रुग्णवाहिका, अग्निशमन दल यांनाही तैनात करावे लागते. अशा प्रकारचे अनाठायी आंदोलन केल्याने शासनाच्या मनुष्यबळ आणि यंत्रणेचा गैरफायदा घेतला जातो. त्यामुळे बीडच्या पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आत्महत्येचा प्रयत्न
पती महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे 18 महिन्यांपासून पोलीस प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र न्याय मिळत नसल्याने पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात विष प्रशन करून आत्महत्येचा प्रयत्न ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला होता. त्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर 72 तासांच्या उपचारानंतर त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला.
72 तास अतिदक्षता विभागात उपचार झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर पोलीस प्रशासनाला एक महिन्याचा अल्टिमेटम ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला. या प्रकरणात आठ तपास अधिकारी बदलून देखील एकाही आरोपीला अटक नाही. त्यामुळे आक्रमक पवित्रा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी घेतला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर न्याय मिळेल, अशी अपेक्षा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली.
रोहित पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा; पोलीस बॉईज संघटना आक्रमक
आमदार रोहित पवार यांनी पोलीस कर्मचाऱ्यावर व्यक्त केलेल्या रोष विरोधात पोलीस बॉईज संघटना आक्रमक झालीय. रोहित पवार यांच्यावर 353 नुसार गुन्हा दाखल करा, अशी मागणी पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी केली. राजकीय परिवारात जन्म घेता म्हणून दादागिरीचे लायसन घेऊन येता का? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. शरद पवार कधीच कोणत्या पोलीस कर्मचाऱ्याला वाकड्या शब्दात बोलले नाही. मात्र रोहित पवार तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.. वारंवार पोलिसांना टारगेट केल्या जाणाऱ्या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जाणार आहे. तर मुंबईतील आझाद मैदानावर पोलीस बॉईज संघटनेकडून निदर्शने केली जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.