आयपीएलआधी सीएसकेमधून 'हे' 3 खेळाडू होणार बाहेर! सुरेश रैना यांनी केले मोठे विधान
आयपीएल 2026च्या रिटेंशनवर सगळ्यांचे लक्ष आहे. चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएल 2025 निराशाजनक ठरला होता आणि तो 10व्या स्थानी राहिला. आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या सीएसकेचे असे प्रदर्शन आश्चर्यकारक होते आणि आता संघात अनेक बदल होण्याची शक्यता दिसत आहे. रवींद्र जडेजा आणि सॅम करणच्या ट्रेड होण्याच्या चर्चा सुरु आहेत. सीएसकेमधून काही मोठ्या खेळाडूंचा पत्ता कट होऊ शकतो आणि याबद्दल सुरेश रैनाने आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी जडेजाच्या भवितव्याबाबतही विधान केले आहे.
सुरेश रैना यांनी आयपीएल 2026च्या रिटेंशनवर आपली मते व्यक्त केले आहे. सीएसकेच्या प्लेइंग प्लॅनबाबत बोलताना त्यांनी रवींद्र जडेजाला रिटेन करण्याचा सल्ला दिला. याच दरम्यान त्यांनी डिवॉन कॉन्वे, विजय शंकर आणि दीपक हुड्डाला रिलीज करण्याची मागणी केली. त्यांनी वेगवेगळ्या नावांवर चर्चा केली आणि आपली मते सर्वांसमोर मांडली. सीएसके मध्ये संजू सॅमसनच्या सामील होण्याचीही बातमी आहे. पुढील सीझनसाठी चेन्नई आताच तयारी सुरू केली आहे.
Comments are closed.