नेतेच बाया नाचवून पैसे जमा करत असतील तर…. भास्कर जाधवांची रामदास कदमांवर बोचरी टीका
भास्कर जाधव आणि रामदास कदम: रामदास कदम यांचा भाऊ अण्णा कदम आणि जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण हॉटेलमध्ये बसून भुरट्या चोरांना पाठवून माझ्या मुलाकडून दहा लाखाची खंडणी आणायला सांगतात. यामध्ये त्यांची काही चूक नाही. त्यांचा नेताच बाया नाचवून पैसे जमा करणारा असेल तर ते तरी काय करणार, अशा शेलक्या भाषेत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांना लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका डान्सबारवरुन रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम (Yogesh Kadam) अडचणीत आले होते. यावरुन भास्कर जाधव यांनी कदमांना टोला लगावला. आम्ही आमच्या आयुष्यात कार्यकर्त्यांना किंवा इतर कोणालाही अशी वळणे लावली नाहीत, असे भास्कर जाधव यांनी म्हटले. ते मंगळवारी दापोलीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
यावेळी भास्कर जाधव यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हुरुप वाढवण्याचा प्रयत्न केला. घाबरून जाऊ नका, दापोली असो नाहीतर खेड. तशीच वेळ आली तर आम्ही तयार आहोत. कोणी किती आणि काहीही केलं तरी दापोली तालुका छमछमला बळी पडणार नाही, हे मी मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांना सांगेन. पुढच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला दापोलीत विजय मिळवायचा आहे. यासाठी ‘आज पेरा म्हणजे उद्या उगवेल’, या धोरणानुसार कामाला लागण्याचा सल्ला भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना दिला.
Dapoli Shivsena News: शिवसेनेचा शाखाप्रमुख कसा अंगात आल्यासारखा पळत राहिला पाहिजे: भास्कर जाधव
या कार्यक्रमात भास्कर जाधव यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांचा जोश वाढवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी शिवसेनेचा शाखाप्रमुख कसा पाहिजे, याबद्दल शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. अलीकडे शाखाप्रमुखाला आमदाराने हाक मारली नाहीतर तो कोपऱ्यात रुसून बसतो. जो कोपऱ्यात बसतो, त्याचं गावात वजन काय असणार? शाखाप्रमुख कसा पाहिजे तर तो अंगात आग लागल्यासारखा नुसता पळत राहिला पाहिजे. पूर्वी ही पद्धती होती. तेव्हा सभा असल्यावर लोकांना आणण्यासाठी जीप, एसी बस नव्हत्या. आम्ही सगळे ट्रकमध्ये बसून किंवा पाठीमागे लटकून जायचो. एखाद्या गावातून सभेला गाड्या पाठवायच्या असतील तर आमचा शाखाप्रमुख पहिल्या गाडीतून कधीच यायचा नाही. सगळे गेल्यावर शेवटच्या गाडीतून तो यायचा. आता सभेसाठी गावातून गाडी यायची असेल तर शाखाप्रमुख सकाळीच इकडे आलेला असतो. त्याला विचारलं की म्हणतो, लोकांच्या येण्याची व्यवस्था केली आहे. तुम्ही सगळ्यांना शाखाप्रमुख पदाचे महत्त्व वाढवले पाहिजे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले.
आणखी वाचा
भास्कर जाधव म्हणाले, मला आतमध्ये टाकण्यासाठी फोन; गृहराज्यमंत्री कदमांची पहिली प्रतिक्रिया
आणखी वाचा
Comments are closed.