मोठी बातमी! सर्वात मोठी T20 लीग परतणार, कोहली-धोनीसारखे दिग्गज दिसणार पुन्हा मैदानात?

चॅम्पियन्स लीग टी-20 परत येणार आहे. अलिकडेच त्याबद्दल एक रिपोर्ट समोर आला आहे. यासोबतच, सीएलटी20 च्या वेळेची माहितीही समोर आली आहे. चॅम्पियन्स लीग शेवटची 2014 मध्ये पाहिली गेली होती. आता वर्षानुवर्षे वाट पाहिल्यानंतर विविध देशांतील टी-20 फ्रँचायझी पुन्हा या स्पर्धेत खेळताना दिसतील.

सिडनी मॉर्निंग हर्डलने चाहत्यांना एक मोठी बातमी दिली. सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या आयसीसी बैठकीत अनेक वेगवेगळ्या देशांनी चॅम्पियनशिप लीग टी-20 च्या पुनरागमनाला पाठिंबा दिला आहे. 2008 मध्ये पहिल्यांदा ही लीग सुरू करण्यात आली आणि 2014 मध्ये ती बंद करण्यात आली कारण ही लीग आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हती. सप्टेंबर 2026 मध्ये चॅम्पियन्स लीग परत आणावी अशी चर्चा झाली आहे. ही लीग परत आली आहे, चाहत्यांना एमएस धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा चॅम्पियन्स लीगमध्ये त्यांच्या आवडत्या आयपीएल संघाच्या जर्सीमध्ये पाहायला मिळेल.

या अहवालात असेही म्हटले आहे की चॅम्पियन्स लीग टी-20 चे नाव बदलले जाईल. याला वर्ल्ड क्लब चॅम्पियनशिप असे संभव आहे. याशिवाय, सध्या 6 संघांमध्ये सहभागी होण्यासाठी चर्चा सुरू आहे. एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, आयसीसीच्या बैठकीत वेळापत्रक, स्वरूप आणि वेळेवरही चर्चा झाली. दरम्यान एमिरेट्स लीग, बिग बॅश लीग, द हंड्रेड, एसए20, एमएलसी आणि कॅरिबियन प्रीमियर लीगच्या सीईओंनाही बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

Comments are closed.