स्मृती-पलाश 7 डिसेंबर रोजी लग्न करणार? जाणून घ्या स्मृतीच्या भावाकडून मोठा खुलासा समोर
भारतीय महिला संघाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smriti Mandhna) व सिने संगीतकार पलाश मुच्छल (Palaash Muchhal) यांचं नोव्हेंबरमधील लग्न स्थगित करण्यात आलं होतं. 23 नोव्हेंबरला सांगलीमध्ये स्मृती व पलाश लग्नबंधनात अडकणार होते. पण स्मृतीच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यामुळे त्यांचं लग्न स्थगित केलं गेलं. पण आता स्मृती व पलाश यांचं येत्या 7 डिसेंबरला लग्न होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर तिचा भाऊ श्रवण मानधना (Smriti’s brother Shravan Mandhana) याने उत्तर दिलं आहे.
स्मृती मानधना व पलाश मुच्छल यांचं 23 नोव्हेंबरला सांगलीत लग्न होणार होतं. 21 तारखेपासूनच त्यांच्या लग्नपूर्वीच्या विधींना सुरूवात झाली होती. स्मृतीच्या लग्नासाठी तिच्या वर्ल्ड चॅम्पियन संघातील सर्व मैत्रिणीदेखील पोहोचल्या होत्या. लग्न स्मृती मानधनाच्या सांगलीतील फार्म हाऊसवर होणार होतं. पण लग्नादिवशीचं तिच्या वडिलांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. ह्रदयविकाराचा झटका येण्याची लक्षणं असल्याने ते 2 दिवस रूग्णालयात होते. त्यामुळे लग्नसोहळा स्थगित झाल्याची माहिती तिच्या मॅनेजरने दिली.
स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यानंतर पलाश मुच्छलदेखील रूग्णालयात भरती करण्यात आलं. स्मृती पलाशचं लग्न स्थगित झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक विविध चर्चांना उधाण आलं, पण यावर स्मृती-पलाश कोणीही काहीही माहिती दिली. यादरम्यान 1 नोव्हेंबरला पहिल्यांदाच पलाश मुच्छल एअरपोर्टवर त्याच्या कुटुंबाबरोबर दिसला होता.
सोशल मीडिया रिपोर्टनुसार, पलाश आणि स्मृतीचे लग्न आता 7 डिसेंबर रोजी होणार आहे. पण, स्मृतीचा भाऊ श्रवण मानधनाने आता या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. स्मृतीचा भाऊ श्रवण मानधनाने यावर म्हटलं की, मला या अफवांबाबत काहीही माहिती नाही. सध्या तरी हे लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे. स्मृतीच्या भावाने दिलेल्या अपडेसनुसार स्मृती व पलाशच्या लग्नाचे रिपोर्ट्स खोटे असल्याचे समोर आलं आहे.
Comments are closed.