बिहारचे निकाल आश्चर्यजनक, सुरुवातीपासून निष्पक्ष नसलेल्या निवडणुकीत जिंकू शकलो नाही, लोकशाही रक
बिहार निवडणूक निकाल 2025 वर राहुल गांधी : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल (बिहार निवडणूक निकाल 2025) जाहीर झाले आहेत. एनडीएने मोठा विजय मिळवला आहे. महाआघाडीचा दारुण पराभव झाला आहे. या निकालानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एक निवेदन जारी केले आहे. महाआघाडीवर विश्वास ठेवणाऱ्या बिहारमधील लाखो मतदारांचे मी मनापासून आभार मानतो. बिहारमधील हा निकाल खरोखरच आश्चर्यजनक असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
महाआघाडीवर विश्वास ठेवणाऱ्या बिहारमधील लाखो मतदारांचे मी मनापासून आभार मानतो. बिहारमधील हा निकाल खरोखरच आश्चर्यजनक आहे. सुरुवातीपासूनच निष्पक्ष नसलेली निवडणूक जिंकण्यात आम्ही अपयशी ठरलो. ही लढाई संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे. काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी या निकालाचा सखोल आढावा घेतील. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी त्यांचे प्रयत्न अधिक प्रभावी करतील.
आम्ही निवडणूक निकालांचा सखोल अभ्यास करु : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया दिली. आम्ही बिहारच्या जनतेच्या निर्णयाचा आदर करतो. वैधानिक संस्थांचा गैरवापर करून लोकशाहीला कमकुवत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींविरुद्ध आमचा लढा सुरू ठेवू. आम्ही निवडणूक निकालांचा सखोल अभ्यास करू आणि निकालांमागील कारणे समजून घेतल्यानंतर सविस्तर बोलू असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
निराश होण्याची गरज नाही
महाआघाडीला पाठिंबा देणाऱ्या बिहारमधील मतदारांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. मी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याला सांगू इच्छितो की निराश होण्याची गरज नाही. तुम्ही आमचा अभिमान आणि सन्मान आहात. तुमचे कठोर परिश्रम ही आमची ताकद आहे. जनजागृती करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही अरे खर्गे म्हणाले. लोकांमध्ये राहून संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आम्ही आमचा संघर्ष सुरू ठेवू. ही लढाई दीर्घकाळ चालणार आहे आणि आम्ही ती पूर्ण समर्पण, धैर्य आणि सत्याने लढू असेही ते म्हणाले.
बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल (Bihar Election Result 2025) जाहीर झाला आहे. आतापर्यंतच्या कलानुसार बिहारमध्ये एनडीए आघाडीला भक्कम आघाडी मिळाली आहे. यानुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
बिहार विधानसभा निकालाचा धक्का बसला नाही, ‘निवडणूक आयोगाचं’ अभिनंदन; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
आणखी वाचा
Comments are closed.